शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोकल पुढाऱ्यांना ‘जोर का धक्का’; रवि राणा चक्क भाजपचे समन्वयक?

By प्रदीप भाकरे | Updated: October 9, 2024 17:48 IST

महायुतीतील तीनही घटकपक्षांची यादी जाहिर : भाजपचे माजी मंत्री जगदिश गुप्ता शिवसेनेत?

प्रदीप भाकरे अमरावती: विधानसभा निवडणुकीची घोषणा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या अनुषंगाने महायुतीतील भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पवार गट या तीन पक्षांचे विधानसभानिहाय समन्वयक जाहिर करण्यात आल्याची एक पोस्ट बुधवारी सोशल व्हायरल झाली आहे. त्‍यात बडनेरा मतदारसंघासाठी भाजपतर्फे आमदार रवी राणा यांचे नाव समन्‍वयक म्‍हणून समोर आल्‍याने भाजपच्‍या स्‍थानिक पदाधिकाऱ्यांना आश्‍चर्याचा धक्‍का बसला आहे. बडनेरा मतदारसंघातील भाजपतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेले स्थानिक नेते व आ. रवि राणा यांच्यातील विळा भोपळ्याचे सख्य सर्वश्रूत आहे. त्यामुळे राणा यांच्या समन्वयकपदानंतर येथील भाजपमधील अंतर्गत राजकारण तापले आहे. त्या यादीची अधिकृतता समोर आलेली नाही.              

दुसरीकडे, अमरावती मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे समन्‍वयक म्‍हणून भाजपचे नेते व माजी राज्‍यमंत्री जगदीश गुप्‍ता यांचे नाव प्रसिद्ध झाल्‍यानेही अनेकांनी आश्‍चर्य व्‍यक्‍त केले आहे. गुप्ता हे अमरावती विधानसभा लढण्यास इच्छूक आहेत. ते भाजपचे नेते देखील आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे समन्‍वयक  म्हणून त्यांचे आलेले नाव अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले आहे. आमदार रवी राणा यांच्‍या पत्‍नी नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजपमध्‍ये प्रवेश केला. पण, त्‍यांना निवडणुकीत पराभव पत्‍करावा लागला. त्‍यानंतर आमदार रवी राणा यांनी सावधपणे पावले टाकण्‍यास सुरूवात केली आहे.

 

गेल्‍या महिन्यात रवी राणा यांच्‍या युवा स्‍वाभिमान पक्षातर्फे आयोजित दहींहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले, तेव्हा राणा यांनी भाजपमध्‍ये जाणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले होते. मात्र दुसरीकडे राणा यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याशी असलेले सख्यही जगजाहिर आहे. लोकसभेवेळी देखील स्थानिक भाजपाईंचा विरोध पत्करून, डावलून नवनीत राणा यांना अमरावतीची उमेदवारी मिळाली होती. आता देखील भाजपचे तुषार भारतीय यांनी बडनेरा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची जोरदार तयारी चालविली आहे. भारतिय आणि राणा यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. त्यामुळे बुधवारी व्हायरल झालेल्या यादीत भाजपचे बडनेरा विधानसभा समन्वयक म्हणून आ. रवि राणा यांचे नाव असल्याने ओरिजनल भाजपाईंमध्ये चिंतेची लकेर उमटल्याचे दिसले. व्हायरल यादी खरी की कसे, त्यावर कुणीही भाष्य केले नाही.

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाBJPभाजपाAmravatiअमरावती