लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीची धनुर्धर व आंतरराष्ट्रीय खेळाडू वृषाली दिनकर गोरले हिला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.वृषाली गोरले हिने २००१ पासून नांदगावच्या एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीत राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक सदानंद जाधव यांच्या मार्गदर्शनात धनुर्विद्येचा सराव सुरू केला. तिने २००१ मध्ये भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले. तिच्या कामगिरीचा आलेख उंचावतच गेला. राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत पाच पदके, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग, वरिष्ठ गट स्पर्धेत चार पदके अशी तिची कामगिरी राहिली. सन २००६ मध्ये जागतिक धनुर्विद्या स्पर्धेसह २००८ मध्ये युरोपातील डोमॅनिक रिपब्लिक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविला. क्रोएशिया, तुर्की, इराण, दिल्ली, कलकत्ता येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्णपदक, चार रजत व कांस्य पदके प्राप्त करीत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. सध्या वृषाली ही रेल्वेच्या धनुर्विद्या संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे.वृषालीने या पुरस्काराचे श्रेय मार्गदर्शक सदानंद जाधव व एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीला दिले आहे.
अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वरमधील वृषाली गोरलेला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 17:04 IST
येथील एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीची धनुर्धर व आंतरराष्ट्रीय खेळाडू वृषाली दिनकर गोरले हिला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.
अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वरमधील वृषाली गोरलेला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार
ठळक मुद्देएकलव्य क्रीडा अकादमीची प्रशिक्षणार्थी