शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शिवभोजन योजनेचा लक्ष्यांक दुपटीने वाढणार, जिल्ह्यांकडून मागवले प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 17:19 IST

गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन देण्याची शासन योजनेची राज्यात २६ जानेवारीपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देशिवभोजन योजनेचा लक्ष्यांक दुपटीने करण्याचा विचार शासनस्तरावर सुरूपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांद्वारा जिल्हा पुरवठा अधिका-यांना अभिप्राय मागविले आहेतगरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन देण्याची शासन योजनेची राज्यात २६ जानेवारीपासून अंमलबजावणी सुरू झाली

अमरावती : शिवभोजन योजनेचा लक्ष्यांक दुपटीने करण्याचा विचार शासनस्तरावर सुरू आहे. यासाठी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांद्वारा जिल्हा पुरवठा अधिका-यांना अभिप्राय मागविले आहे. त्यानुसार पश्चिम विदर्भात केंद्रसंख्येत ४ ने वाढ व अस्तित्वातील केंद्रात थाळ्यांच्या संख्यावाढीचे प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहे. यानुसार पश्चिम विदर्भात ९५० थाळ्यांची संख्यावाढ अपेक्षित आहे.गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन देण्याची शासन योजनेची राज्यात २६ जानेवारीपासून अंमलबजावणी सुरू झाली. यामध्ये १० रुपयांमध्ये शासकीय अनुदानप्राप्त भोजनालयातून २ चपात्या, १ वाटी भाजी, १ वाटी भात व १ वाटी वरण समाविष्ट असलेली थाळी उपलब्ध करण्यात आलेली आहे. योजनेला वाढता प्रतिसाद असल्याने तासभरात शिवभोजनाचा लाभ बंद करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शिवभोजन सुरू असलेल्या केंद्रांमध्ये अपेक्षित वाढींची संख्या व यासोबतच जिल्हा रुग्णालये, बसस्थानके, रेल्वे स्टेशन परिसर, बाजारपेठा, शासकीय कार्यालये याठिकाणची मागणी व वर्दळीचे ठिकाण यांचा सर्वंकक्ष अभ्यास करून पुरवठा विभागाने जिल्हास्तरावरून तत्काळ अहवाल मागितले आहेत.

यासोबतच संबंधित शहरात ज्या ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू झालेली आहेत, त्या केंद्रांची अपेक्षित वाढीव थाळींची संख्या आणि अपेक्षित वाढीव केंद्रांमधील थाळींची संख्या याची बेरीज ही मंजूर केलेल्या थाळीसंख्येच्या दुपटीपेक्षा अधिक व कमीही नसावी व अस्तित्वातील  व नवीन केंद्रातील थाळीची संख्या ही २०० च्या मर्यादेत असावी, असे पुरवठा विभागाचे अवर सचिवांनी स्पष्ट केले.  शिवथाळींची जिल्हानिहाय वाढअमरावती जिल्ह्यात ३ नवीन केंद्रांची वाढ व ४०० थाळी संख्या, अकोला जिल्ह्यात २ नवीन केंद्र व ३०० थाळी, वाशीम जिल्ह्यात अस्तित्वातील २ केंद्रात १०० थाळींनी वाढ, यवतमाळ जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या ३ केंद्रांमध्ये १०० थाळ्यांची संख्यावाढ व बुलडाणा जिल्ह्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या ३ केंद्रांपैकी १ केंद्रात ५० थाळींनी संख्यावाढ आवश्यक असल्याचा अहवाल विभागीय आयुक्तस्तरावश्रून पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र