‘शिवाजी’चे अध्यक्षपद नियमबाह्य
By Admin | Updated: December 24, 2015 00:12 IST2015-12-24T00:12:38+5:302015-12-24T00:12:38+5:30
येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्षांच्या अधिकारावरील निर्बंधाबाबत विभागीय सहनिबंधकाचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने कायम ठेवले आहेत.

‘शिवाजी’चे अध्यक्षपद नियमबाह्य
प्रदीप महल्ले यांचा आरोप : सहनिबंधकाचे आदेश गुंडाळले
अमरावती : येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्षांच्या अधिकारावरील निर्बंधाबाबत विभागीय सहनिबंधकाचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने कायम ठेवले आहेत. त्यामुळे अरुण शेळके यांना अध्यक्षपदावर राहता येत नाही. त्यांचे पद हे नियमबाह्य असून त्यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे, अशी मागणी माजी उपाध्यक्ष दिलीप इंगोले, प्रदीप महल्ले यांनी बुधवारी पत्रपरिषदेतून केली.
शिवाजी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा वाद हा सर्वश्रूत असला तरी विभागीय सहनिबंधकांनी २० मे २०१५ रोजी संस्था अध्यक्षांच्या अधिकारावर निर्बध लादले आहे. त्याअनुषंगाने २७ जुलै रोजी आदेश पारीत केले आहे.
त्यामुळे ‘शिवाजी’च्या अध्यक्षांना कोणतेही अधिकार, धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. अध्यक्ष वगळता उर्वरित ८ पदासाठी २८ फे ब्रुवारी २०१६ पूर्वी नव्याने निवडणूक प्रक्रिया घेण्याचा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. मात्र, अध्यक्ष हे पदाचा दुरुपयोग करुन व्यवहार, निर्णय प्रक्रियेत सहभागी होत असल्याचा आरोप प्रदीप महल्ले, दिलीप इंगोले यांनी केला आहे. यासंदर्भात शिवाजीचे अध्यक्ष अरुण शेळके यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. (प्रतिनिधी)