शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

शिवभोजनाला लग्न समारंभातून अन्न मिळावं, बच्चू कडूंची भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 18:10 IST

जिथं जिथं अन्नदान आणि जेवणाचा कार्यक्रम आहे, तेथून शिवभोजन थाळीसाठी

अमरावती - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवभोजन योजनेला आजपासून सुरुवात करण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी, अमरावती जिल्ह्यातील बाजार समिती परिसरात या शिवभोजनालयाचे उद्घाटन करताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थितांना भावनिक साद घातली. तर, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, ज्यांची ऐपत असेल त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये, असे आवाहन केले. 

अजित पवार यांनी पुण्यामध्ये आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईत तर बच्चू कडू यांनी अमरावती येथे या योजनेचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी भावनिक साद घातली. शिवभोजनाचा आनंद आहे, पण आपण जेवण कोणाला देतोय याचं दु:ख आहे. कारण, 10 रुपयांत जेवण जेवण्याची वेळ आमच्या शेतकऱ्यांवर, लोकांवर का येते हा चिंतेचा विषय आहे, असे कडू यांनी म्हटले. तसेच, आपण सर्वांनी शिवभोजनासाठी साथ आणि मदत केली पाहिजे. शिवभोजनाची व्याप्ती वाढविण्यासाठी आपलेही सहाकार्य गरजेचं आहे. एखाद्या लग्नसमारंभाच्या ठिकाणी जेवणाच्या पंगती बसतात. मग, याच मंगलकार्यालयातून शिवभोजनासाठी काही अन्न लाभलं तर नक्कीच हे स्वागतार्ह पाऊल असेल, असेही ते म्हणाले.   

जिथं जिथं अन्नदान आणि जेवणाचा कार्यक्रम आहे, तेथून शिवभोजन थाळीसाठी अन्न यायला हवं. आपला सहभाग लाभल्यास या योजनेची व्याप्ती नक्कीच वाढेल. माझ्या आईनं आमच्या घराशेजारी असलेल्या मानसिक रुग्णाला 25 वर्षे दोन वेळचं जेवण दिलं. भूक भागविण्यासाठी माती खाणारा तो रुग्ण जेवण करायला लागला. आम्ही प्रहारच्या माध्यमातून 700 लोकांना जेवणाचा दररोज डब्बा पुरवतो. कारण, परिस्थिती भीषण असून भूकेल्यांची संख्या जास्त आहे. नातं हे जाती-धर्मातून नव्हे तर सेवेतून निर्माण करता आलं पाहिजे, असे म्हणत बच्चू कडू यांनी उपस्थितांना भावनिक साद घातली.  

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूshiv bhojnalayaशिवभोजनालयministerमंत्रीmarriageलग्नfoodअन्नAmravatiअमरावती