नांदगावात शिवसेनेने केला नारायण राणेंचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:16 IST2021-08-26T04:16:08+5:302021-08-26T04:16:08+5:30
नांदगाव खंडेश्वर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा नांदगावात संतप्त शिवसैनिकांनी निषेध ...

नांदगावात शिवसेनेने केला नारायण राणेंचा निषेध
नांदगाव खंडेश्वर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा नांदगावात संतप्त शिवसैनिकांनी निषेध केला. मंगळवारी दुपारी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक बस स्थानक परिसरात गोळा झाले. घोषणाबाजी करून फलक व झेंडे झळकावून जोरदार निषेध व्यक्त केला.
आंदोलनाचे नेतृत्व उपजिल्हाप्रमुख डॉ. प्रमोद कठाळे यांनी केले होते. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख विष्णूपंत तिरमारे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर, शिवसेना शहरप्रमुख अरुण लाहबर, उपतालुकाप्रमुख दिलीप देवतळे, योगेश काळेकर, सुमीत मारोटकर, धीरज भोणे, रवि ठाकूर, प्रकाश ब्राह्मणवाडे, पुंडलिक तरेकर, विजय आजबले, दिलीप बोरकर, राजू राऊत, नीलेश ईखार, नितीन चव्हाण, आशिष बनसोड, तेजस काळसर्पे, अनिल बुधले, सुनील गुरमुळे, गोकुळ राठोड तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.