शहरात विविध ठिकाणी शिवजंयती सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:14 IST2021-04-01T04:14:29+5:302021-04-01T04:14:29+5:30

अमावती : जिल्हा शिवसेनेतर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या नेतृत्वात अमरावती शहरात तसेच ग्रामीण भागात छत्रपती शिवाजी महाराज ...

Shiv Jayanti celebrations at various places in the city | शहरात विविध ठिकाणी शिवजंयती सोहळा

शहरात विविध ठिकाणी शिवजंयती सोहळा

अमावती : जिल्हा शिवसेनेतर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या नेतृत्वात अमरावती शहरात तसेच ग्रामीण भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती सोहळा कोरोना नियमांचे पालन करून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सुनील खराटे यांनी महाराजांना मानाचा मुजरा करून जयंती साजरी केली.

महाराष्ट्रात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्रिसूत्रीचा अवलंब करावा तसेच सर्व उत्सव कोरोना नियमांचे पालन करून साजरे करावे असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व कोरोना नियमांचे पालन करून शिवजयंती जिल्ह्यात साजरी करण्यात आली.

खराटे यांनी महाजनपुरा गेट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अभिषेक करून अभिवादन केले. नवाथे प्लॉट, विद्यापीठ चौक, दस्तुर नगर, गांधी चौक, अंबागेट आदी ठिकाणी आयोजित सोहळा साजरा करण्यात आला.

Web Title: Shiv Jayanti celebrations at various places in the city