बेडरूममध्ये शिरून वहिनीची छेडखानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:16 IST2021-09-14T04:16:32+5:302021-09-14T04:16:32+5:30
अमरावती: वहिनीच्या बेडरूममध्ये शिरून तिला चक्क शरीरसुखाची मागणी करण्यात आली. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रारीवरून आरोपी चुुलत दिराविरुद्ध ...

बेडरूममध्ये शिरून वहिनीची छेडखानी
अमरावती: वहिनीच्या बेडरूममध्ये शिरून तिला चक्क शरीरसुखाची मागणी करण्यात आली. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रारीवरून आरोपी चुुलत दिराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. येथील पार्वतीनगर क्रमांक २ परिसरातील एका घरी ही घटना घडली.
आरोपी हा फिर्यादी महिलेचा चुलत दीर असून, तो दर आठ दहा दिवसांनी भेटायला येत असतो. सहा सात महिन्यांपासून तो जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याची बाब फिर्यादी महिलेच्या लक्षात आली. मात्र, तिने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी दुपारच्या वेळी फिर्यादीचे सासू सासरे घरी हजर असताना तो घरी आला. ती महिला बेडरूममध्ये एकटी असताना त्याने तिचा विनयभंग केला. फोनवर का बोलत नाहीस, माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, अशी मागणीदेखील केली. घरातील अन्य पाहुुणे गेल्यानंतर हा सर्व प्रकार पिडिताने पतीला सांगितला. पतीने आरोपी चुलतभावाला फोनवरून समजावले. पुन्हा आरोपी चुलत दीर फिर्यादीच्या घरी आला व त्याने तिच्यासह भावासोबतदेखील वाद घातला. त्यामुळे १२ सप्टेंबर रोजी त्या महिलेने खोलापुरी गेट पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.