शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘ईडी’ सरकारने जाहीर माफी मागावी, अन्यथा मराठा समाज.. वादग्रस्त वक्तव्यावर नाना पटोलेंचा संताप

By गणेश वासनिक | Updated: September 26, 2022 17:21 IST

तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर नाना पटोले आक्रमक

अमरावती : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात मराठा समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. राज्याच्या ‘ईडी’ सरकारने जाहीर माफी मागावी. तसेच बेताल वक्तव्य करणाऱ्या तानाजी सावंत यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवेल. असा सणसणीत टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावती येथे पत्रपरिषदेतून भाजपला लगावला.

नाना पटोले गत दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीका केली. राज्यातील ‘ईडी’ सरकार हे दिल्लीच्या ईशाऱ्यावर चालत आहे. मोदी-शहांच्या आदेशानुसार मंत्रिमंडळाचे वाटप झाले. म्हणूनच एका मंत्र्यांकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद सोपविले, अशी टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे गुजरात दौऱ्यावर गेल्याबाबत नाना पटोले यांनीआता राज्य सरकारला प्रत्येक गोष्ट गुजरातलाच विचारून करावी लागेल. त्यामुळेच महाराष्ट्रातून दीड लाख लोकांना रोजगार देणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प मोदी-शहा यांना सहजतेने पळवून नेता आला, असे ते म्हणाले. 

राज्य सरकारने तानाजी सावंत प्रकरणी माफी मागावी, अन्यथा हा मुद्दा आगामी विधानसभेत उपस्थित करून सरकार बरखास्त करण्याची मागणी करू, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. मोदी सरकार शेतकरी, बेरोजगारी, युवकांचे प्रश्न, समस्यांबाबत बोलत नाही, अशी टीका केली. 

यावेळी माजी मंत्री ॲड. यशेामती ठाकूर, महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, आमदार बळवंत वानखडे, वजाहत मिर्झा,डॉ. सुनील देशमुख, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर विलास ईंगोले, डॉ.अंजली ठाकरे आदी उपस्थित हाेते.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेTanaji Sawantतानाजी सावंतcongressकाँग्रेस