नवीन वाहनांवर शिलेदारांचा डोळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 22:03 IST2017-08-27T22:02:53+5:302017-08-27T22:03:11+5:30

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनाने एका पदाधिकाºयासह अधिकाºयाच्या दिमतीला असलेल्या दोन कार निर्लेखित केल्या आहेत.

Shihladar's eye on new vehicles! | नवीन वाहनांवर शिलेदारांचा डोळा !

नवीन वाहनांवर शिलेदारांचा डोळा !

ठळक मुद्देजिल्हा परिषद : ताफ्यात दोन वाहने दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनाने एका पदाधिकाºयासह अधिकाºयाच्या दिमतीला असलेल्या दोन कार निर्लेखित केल्या आहेत. त्या बदल्यात १४ आॅगस्ट रोजी झेडपीच्या ताफ्यात दोन नवीन करकरीत वाहने नव्याने दाखल झाले आहेत. त्यामुळे या दोन नवीन वाहनांवर सध्या झेडपीच्या शिल्लेदाराच्या नजरा लागल्याची जोरदार चर्चा मिनीमंत्रालयात सुरू आहे.
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने विद्यमान आरोग्य व वित्त सभापती बळवंत वानखडे यांच्या दिमतीला असलेले वाहन क्रमांक एम एच २७ ए.ए.५० आणि पंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकाºयांच्या नावाने असलेले वाहन क्रमांक एम एच २७ एच ९१९५ ही जुनी दोन वाहन निर्लेखित केलीत व त्याबदल्यात दोन नवीन कार खरेदी केल्या आहेत.
त्यानुसार नवीन करकरीत असलेल्या कार या वरील पदाधिकारी व अधिकाºयांना मिळणे नियमानुसार क्रमप्राप्त आहे. परंतु पदाधिकारी यांच्या दिमतीला असलेले वाहन जुने व नादुरूस्त असल्याचे कारण पुढे करीत जिल्हा परिषदेच्या ताफ्यात दाखल झालेल्या या दोन वाहनांवर एका पदाधिकाºयांचा डोळा आहे. आपल्याकडील जुने वाहन देवून त्याबदल्यात नवीन वाहन मिळावे, यासाठी या पदाधिकाºयांच्या काही चाहत्यांकडून प्रशासनाकडे लॉबिंग सुरू केले जात असल्याची माहिती आहे. मात्र ज्यांची वाहने प्रशासनाने निर्लेखित केलीत त्यांनाच नवीन करकरीत कार देण्याचा प्रशासकीय यंत्रणेकडून प्रशासन प्रमुखांकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे. त्यामुळे ज्याच्यासाठी ही वाहने नव्याने दाखल झालीत त्यांनाच ही वाहने मिळणार की त्या पदाधिकाºयाला दिले जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Shihladar's eye on new vehicles!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.