२३ निवारा केंद्रांमध्ये ९५३ जणांना आश्रय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 05:00 IST2020-04-10T05:00:00+5:302020-04-10T05:00:38+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून सीईओंनी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे वसतिगृह व मोठ्या शाळा अधिग्रहीत करण्याचे आदेश तहसीलदार, बीडीओ व मुख्याधिकाºयांना दिले आहेत. तेथे धान्य, पाणी, भोजनाची सुविधा पुरविण्याकरिता तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली बीडीओ, नगर परिषदेचे सीओ यांच्या समितीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे.

२३ निवारा केंद्रांमध्ये ९५३ जणांना आश्रय
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळ दस्तगीर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत बेघर, विस्थापित कामगार, स्थलांतरित मजुरांकरिता जिल्ह्यात २३ ठिकाणी निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. जिल्हाभरात २ एप्रिलपर्यंत ९५३ नागरिकांना आश्रय देण्यात आला आहे. यासंदर्भातील अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी सीईओ अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनात पाणीपुरवठा विभागाचे डेप्युटी सीईओ श्रीराम कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून सीईओंनी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे वसतिगृह व मोठ्या शाळा अधिग्रहीत करण्याचे आदेश तहसीलदार, बीडीओ व मुख्याधिकाºयांना दिले आहेत. तेथे धान्य, पाणी, भोजनाची सुविधा पुरविण्याकरिता तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली बीडीओ, नगर परिषदेचे सीओ यांच्या समितीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. यासंदर्भात समितीच्या कार्यवाहीचा अहवाल झेडपीच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे आलेल्या अहवालानुसार, २ एप्रिलपर्यंत २३ निवारा केंद्रांत ९५३ नागरिकांना आश्रय देण्यात आलेला आहे. १८ ठिकाणांहून भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. विविध सामाजिक संघटनांद्वारेही अन्नदान, कपडे व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे.