घर प्रपंच सांभाळत तिने गाठले ध्येय
By Admin | Updated: March 14, 2016 00:06 IST2016-03-14T00:06:59+5:302016-03-14T00:06:59+5:30
मुलींनी जे काही कारायचे, जे काही शिकायचे ते सर्व लग्नाआधी; कारण लग्नानंतर घर, प्रपंच सांभाळताना काही शक्य होत नाही, असे म्हणणाऱ्यांसाठी ...

घर प्रपंच सांभाळत तिने गाठले ध्येय
आदर्श : वैशाली राऊत प्रथम श्रेणी न्यायाधीश
चांदूररेल्वे : मुलींनी जे काही कारायचे, जे काही शिकायचे ते सर्व लग्नाआधी; कारण लग्नानंतर घर, प्रपंच सांभाळताना काही शक्य होत नाही, असे म्हणणाऱ्यांसाठी चांदूररेल्वेच्या वैशाली राऊत यांनी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारीपदाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन नवा आदर्श मांडला आहे.
सरदार चौक परिसरातील विवेक राऊत यांच्या पत्नी वैशाली राऊत या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी झाल्या आहेत. प्रचंड जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी हे यश मिळविले. लग्नानंतर महिलांना असतात ते सर्वच कामे वैशालीच्या वाटेला आले होते. घरी पती, सासू व पाच वर्षांचा मुलगा विहान या सर्वांचा सांभाळ करून या अभ्यासाला वेळ काढत असे. सणासुदीनिमित्त आलेले पाहुणे, सर्वांचे सुख, दु:ख इतर कार्यक्रमाकडेही गृहिणी म्हणून वैशाली यांनी दुर्लक्ष केले नाही. अपयशाने खचून न जाता यावर्षी पुन्हा परीक्षा दिली. ज्या उणिवा राहून गेल्या त्या सर्व दूर केल्यात. २७ जानेवारीला मुलाखत दिली आणि १० मार्च रोजी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये वैशाली उत्तीर्ण झाल्यात. (तालुका प्रतिनिधी)