‘त्या’ मुलीच्या डोळ्यातून निघतात जिवंत गोचीड
By Admin | Updated: December 23, 2014 22:55 IST2014-12-23T22:55:29+5:302014-12-23T22:55:29+5:30
अवघ्या ११ वर्षीय मुलीच्या डोळ्यातून डझनावर गोचिड येत असल्याचा दावा ‘त्या’ कुुटुंबीयांनी केल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रापुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे. दुसरीकडे वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी व अंधश्रद्धा

‘त्या’ मुलीच्या डोळ्यातून निघतात जिवंत गोचीड
कोठा येथील घटना : भानामती नसल्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा दावा
वसंत कुळकर्णी - तळेगाव दशासर
अवघ्या ११ वर्षीय मुलीच्या डोळ्यातून डझनावर गोचिड येत असल्याचा दावा ‘त्या’ कुुटुंबीयांनी केल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रापुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे. दुसरीकडे वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी व अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा दावा फेटाळून लावला आहे.
तळेगाव दशासरपासून जवळच असलेल्या कोठा येथील काजल देवीदास हटवार (११) नामक मुलीच्या डोळ्यातून हे गोचीड निघू लागल्यामुळे तिचे शिक्षण प्रभावित होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.
डोळ्याला होतात वेदना
तळेगाव दशासरपासून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या कोठा येथील काजळ देवीदास हटवार ही इयत्ता सहावीची विद्यार्थिनी आहे. तिच्या उजव्या डोळ्यातून दररोज २० ते २१ जिवंत गोचीड मागील १ महिन्यापासून निघत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. डोळ्यातून जीवंत गोचीड बाहेर येत असल्याने काजल शाळेत जाऊ शकत नाही. यामुळे हटवार कुटुंब हतबल झाले आहे. यासाठी काजलला परिवारातील सदस्यांनी तळेगावला आणले. काही दिवस बाहेरगावला ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोचीड निघण्याचे प्रमाण थोडे कमी झाले होते. डोळ्यातून निघालेले काही जिवंत गोचीड सायंकाळी पाण्यात टाकून ठेवले असता सकाळी त्याचे रेतीचे खडे झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तिच्या डोळ्यातून गोचीड बाहेर येत असल्यास डोळ्याला त्रास होऊ लागतो आणि अंधूक दिसू लागते. काही वेळातच गोचीड डोळ्यात फिरताना दिसू लागतो. नंतर दुसऱ्या व्यक्तीकडून तो काढावा लागतो. असे एकापाठोपाठ गोचीड निघू लागल्याने मुलीला नाहक त्रास होतो. तिच्यावर डॉक्टरांकडून उपचार करुनही काहीच परिणाम झाल्याचे दिसत नाही. हा अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. तर दुसरीकडे हा भानामतीचा प्रकार असल्याची चर्चा ग्रामसथ करीत आहेत. काजलची आईसुद्धा १ वर्षांपासून रक्तस्त्रावाने आजारी आहे. तिच्यावरही तज्ज्ञांनी उपचार केले. परंतु काहीही आढळून आले नाही. एक वर्षांपूर्वी तिच्या आईच्या केसामधून गोचीड काढण्यात आल्याचे परिवारातील सदस्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.