शकुंतलेच्या इंजिनने घेतला पेट

By Admin | Updated: April 18, 2017 00:27 IST2017-04-18T00:27:15+5:302017-04-18T00:27:15+5:30

स्थानिक रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या शकुतंला रेल्वेच्या इंजिनने पेट घेतल्याची घटना रविवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली.

Shakuntala's engine brought in the stomach | शकुंतलेच्या इंजिनने घेतला पेट

शकुंतलेच्या इंजिनने घेतला पेट

दर्यापुरातील घटना : कुठलीही हानी नाही
दर्यापूृर : स्थानिक रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या शकुतंला रेल्वेच्या इंजिनने पेट घेतल्याची घटना रविवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
परतवाड्याहून मूर्तीजापुरकडे जात असताना शंकुतला रेल्वे दर्यापूर स्टेशनवर थांबली होती. कडाक्याच्या उन्हात डिझेलवर चालणाऱ्या या गाडीच्या इंजीनने पेट घेतला. घटना गंभीर नसली व यात कोणतीही हानी झाली नसली तरी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
ब्रिटीशकालिन शकुंतला अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरत असते. घटनेची माहिती मिळताच दर्यापूर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. एखाद्या प्रवाशाने अथवा नागरिकाने सिगारेट ओढून थोटूक फेकल्याने ही आग लागली, याचा शोध सुरू आहे. रेल्वे विभागाचे अधिकारी व पोलीस झाल्या प्रकाराचा शोध घेत आहेत. शकुंतला रेल्वेबाबतचे अनेक किस्से वारंवार चर्चेत येत असले तरी ही रेल्वे प्रवाशांची लाडकी आहे. त्यामुळे या रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अद्यापही बऱ्यापैकी आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Shakuntala's engine brought in the stomach