भंगार वेगळे करण्याची शक्कल; कचरा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:01 IST2020-06-23T05:00:00+5:302020-06-23T05:01:16+5:30

गल्लीबोळात ऑटोरिक्षा फिरून घराघरांतून कचरा संकलन करतात. त्यानंतर ऑटोरिक्षात जमा होणारा कचरा हा एका ठिकाणी गोळा केल्यानंतर ट्रकद्वारे नजीकच्या सुकळी येथील कंम्पोस्ट डेपोत विलगीकरणासाठी नेण्यात येतो. परंतु, कचरा कम्पोस्ट डेपोमध्ये नेण्यापूर्वी कंत्राटी सफाई कामगार अथवा महापालिका स्वच्छता कर्मचारी हे विशिष्ट ठिकाणी गोळा होणाऱ्या कचऱ्यातून भंगार, प्लॉस्टिक साहित्य वेचण्यासाठी कचरा शोधून काढतात.

Shackles to separate debris; Garbage on the street | भंगार वेगळे करण्याची शक्कल; कचरा रस्त्यावर

भंगार वेगळे करण्याची शक्कल; कचरा रस्त्यावर

ठळक मुद्देआरोग्याशी खेळ : रामपुरी कॅम्प ते डफरीन मार्गातील प्रकार; दुर्गंधीने नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका कंत्राटी सफाई कामगार व घनकचरा वाहतूक यंत्रणेतील कर्मचारी हे कचऱ्यातून भंगार, प्लास्टिक साहित्य वेगळे करून ते विकण्यासाठी चक्क रस्त्यालगत कचरा टाकत असल्याचे चित्र आहे. हा प्रकार रामपुरी कॅम्प ते डफरीन मार्गावरील नाल्याच्या काठावर नित्याचाच झाला आहे. हा आरोग्याशी खेळ थांबवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे.
गल्लीबोळात ऑटोरिक्षा फिरून घराघरांतून कचरा संकलन करतात. त्यानंतर ऑटोरिक्षात जमा होणारा कचरा हा एका ठिकाणी गोळा केल्यानंतर ट्रकद्वारे नजीकच्या सुकळी येथील कंम्पोस्ट डेपोत विलगीकरणासाठी नेण्यात येतो. परंतु, कचरा कम्पोस्ट डेपोमध्ये नेण्यापूर्वी कंत्राटी सफाई कामगार अथवा महापालिका स्वच्छता कर्मचारी हे विशिष्ट ठिकाणी गोळा होणाऱ्या कचऱ्यातून भंगार, प्लॉस्टिक साहित्य वेचण्यासाठी कचरा शोधून काढतात. त्याकरिता कचरा अक्षरश: तासनतास पडून राहत असल्याचे वास्तव आहे. रामपुरी कॅम्प ते डफरीन मार्गावरील नाल्याच्या काठावर या कचऱ्यावर भटके श्वान, पशू ताव मारतात. कचऱ्यातून येणारे प्लास्टिकसुद्धा पशूंच्या पोटात जाते.बरेचदा हा कचरा रस्त्यालगत तसाच पडून राहत असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना येथून तोंडाला रूमाल किंवा हात लावून जावे लागते. भंगार वेचणे, प्लास्टिक साहित्य वेगळे करणे हा प्रकार त्वरित थांबवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.


आरोग्य निरीक्षक, लोकप्रतिंनिधींचे दुर्लक्ष
नागरी वस्तीत रस्त्यालगत कचरा एकत्रित करणे आणि त्यातून भंगार वेचण्याचा हा नवा फंडा सुरू असताना, महापालिका आरोग्य निरीक्षक अथवा लोकप्रतिनिधींना ही बाब दिसू नये, याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्यालगत कचरा संकलन करणारे ऑटोरिक्षा, ट्रक उभे राहत असल्याने वाहनचालक, पादचाऱ्यांना दुर्गंधीतून मार्ग शोधावा लागतो. कोरोना संसर्गाची भीती असतानाही रस्त्यावर सर्रास कचरा टाकून भंगार वेचले जाते.

Web Title: Shackles to separate debris; Garbage on the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.