घरात घुसून महिलेचे लैंगिक शोषण, अनैसर्गिक कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:14 IST2021-09-19T04:14:25+5:302021-09-19T04:14:25+5:30
अमरावती : महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक शोषण केले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर अन्य एका युवतीच्या ...

घरात घुसून महिलेचे लैंगिक शोषण, अनैसर्गिक कृत्य
अमरावती : महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक शोषण केले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर अन्य एका युवतीच्या मदतीने तिच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना गाडगेनगर ठाणे हद्दीतील केवल कॉलनीत १७ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदविला.
या गुन्ह्यात मदत करणाऱ्या एका तरुणीसह आरोपी तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
पोलीससूत्रांनुसार, निखिल टिकले (रा. अर्जुननगर) व एक १९ वर्षीय तरुणी असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार पूर्वीच्या भांडणातून हा गुन्हा घडला. फिर्यादी ३५ वर्षीय विवाहित महिलेच्या तक्रारीनुसार आरोपी फिर्यादीच्या घरात शिरला. त्याने जबरदस्तीने तिचे लैंगिक शोषण केले. या महिलेसोबत आरोपीची ओळख असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पीडित महिलेला संशय होता की, या गुन्ह्यातील युवतीसोबत पीडितेच्या पतीचे काहीतरी संबंध होते. तसेच ती आरोपीच्या संपर्कात होती. तिने या गुन्ह्यात आरोपीला अनैसर्गिक कृत्य करण्यास प्रत्यक्ष मदत केल्याने पोलिसांनी तिलाही आरोपी केले असून, ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध भादंविची कलम ३७६,३७७,४५२,३५४,३२३,५०४,५०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आर. जे चंदापुरे करीत आहेत.
बॉक्स :
अशी घडली घटना
पीडित महिला व तिचे पती उज्जैन येथे गेले होेते. तेथून परत आल्यानंतर तिने पतीचा मोबाइल बघितला. मोबाइलमध्ये या गुन्ह्यातील आरोपी तरुणीचा फोटो दिसला. तुमच्या मोबाइलमध्ये तिचा फोटो कसा असे महिलेने पतीला विचारले त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यानंतर पीडितीने त्या तरुणीचा बाबा हॉटेलनजीक शोध घेतला. तिने त्यांचे काही तरी भांडण झाले. त्यानंतर तिचा बदला घेण्याकरिता महिलेने तरुणासोबत प्लॅन रचला. तिचा पती घरी नसताना ते गेले तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. तर तरुणीने तिच्या गुदद्वारात नको तो प्रकार करून अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार पीडितेने गाडगेनगर ठाण्यात नोंदविली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.