व्हिडीओ असल्याचे सांगून विवाहित महिलेवर लैगिंक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:11 AM2021-06-25T04:11:46+5:302021-06-25T04:11:46+5:30

अमरावती : पतीपासून विभक्त असल्याचा फायदा घेऊन एका २७ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी फ्रेजरपुरा हद्दीत ...

Sexual abuse on a married woman claiming to have a video | व्हिडीओ असल्याचे सांगून विवाहित महिलेवर लैगिंक अत्याचार

व्हिडीओ असल्याचे सांगून विवाहित महिलेवर लैगिंक अत्याचार

Next

अमरावती : पतीपासून विभक्त असल्याचा फायदा घेऊन एका २७ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी फ्रेजरपुरा हद्दीत उघडकीस आली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी संतोष मांडवगडे (३० रा. कवठा, नांदगाव खंडेश्वर) याच्याविरुध्द गुन्हा नोंदविला.

२७ वर्षीय विवाहित महिला वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे पती व एक वर्षीय मुलासोबत राहत होती. परंतु पतीच्या त्रासामुळे ती यवतमाळ जिल्ह्यात माहेरी राहायला गेली. त्यावेळी लहान बहिणीच्या पतीने महिलेला अमरावतीत एका ठिकाणी स्वयंपाकी म्हणून काम लावून दिले. त्यामुळे ती महिला भाड्याने खोली करून राहू लागली. दरम्यान तिची ओळख संतोष मांडवगडेशी झाली. त्याने नवऱ्याचा परिचय देऊन तिच्याशी फोनवर बोलणे सुरू केले. एकेदिवशी नवऱ्याबदल काही बोलायचे असल्याचे सांगून संतोषने तिला कवठा येथे नेले आणि गोठ्यात तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यानच्या काळ्यात तिच्या पतीचा नदीत बुडून मृत्यू झाला. त्यामुळे ती पतीच्या मयतीत गेली. त्यानंतर ती काही दिवस माहेरी राहिली. परंतु संतोषने महिलेला फोन करून तुझे व्हिडीओ आणि फोटो असल्याचे सांगितले. त्यामुळे ती महिला पुन्हा अमरावतीत आली असता, संतोषने पुन्हा महिलेच्या इच्छेविरुध्द शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने २४ जून रोजी फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी संतोष मांडवगडेविरुध्द गुन्हा नोंदविला. आरोपीला कवठा येथून अटक केले आहे. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३६३, ३७६(२) (एन) ५०६ नुसार गुन्हा नोंदविला. पुढील तपास ठाणेदार पुंडलिक मेश्राम करीत आहे.

Web Title: Sexual abuse on a married woman claiming to have a video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.