शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

लग्नाचे आमिष देऊन अत्याचार, नंतर 'गर्भपात कर; अन्यथा खल्लास करून टाकेन'ची धमकी

By प्रदीप भाकरे | Updated: December 20, 2022 17:32 IST

लिव्ह इन रिलेशनशिपमधील प्रकार; गुन्हा दाखल

अमरावती : ज्याच्यावर जीव ओवाळून टाकला, ज्याच्यासोबत सात फेरे घेण्याचे स्वप्न पाहिले, त्याच प्रियकराने प्रेयसीला गर्भपात कर, अन्यथा खल्लास करून टाकेन, अशी गर्भित धमकी दिली. त्या धमकीने तिच्या पायखालची वाळू सरकली. अखेर तिने त्याच्याविरूद्ध पोलीस ठाण्याची पायरी गाठत तक्रार दाखल केली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी १९ डिसेंबर रोजी नांदेडच्या आरोपीविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे ते युगूल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला. त्यातून पीडित तरुणीला गर्भधारणा झाल्यावर गर्भपातासाठी तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही संतापजनक घटना राजापेठ ठाण्याच्या हद्दीत १९ डिसेंबर रोजी उघडकीस आली. अविनाश लक्ष्मण मगीरवार (३७, रा. कुंटुर, नांदेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

अविनाशची जानेवारी २०१९ मध्ये येथील ३२ वर्षीय तरुणीसोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रित झाल्यावर अविनाशने पीडित तरुणीचा विश्वास संपादन करून तिला प्रेमजाळ्यात ओढले. त्यानंतर दोघेही ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहू लागले. या काळात अविनाशने पीडित तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण केले. त्यातून पीडित तरुणीला गर्भधारणा झाली. याबाबत अविनाशला कळल्यावर त्याने गर्भपात कर, अन्यथा तुला जिवाने मारेल, अशी धमकी पीडिताला दिली. या प्रकरणी पीडित तरुणीने राजापेठ ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी अविनाशविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास आरंभला आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAmravatiअमरावतीSexual abuseलैंगिक शोषण