शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

जलयुक्तच्या गाळाने शिवार समृद्ध, ३,९६० कामांतून १७० लाख घनमीटर काढला गाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 16:49 IST

अमरावती : टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून विभागातील १५१९ गावांतील कामांमधून १७०.१५ लाख घनमीटर गाळ उपलब्ध झाला.

- गजानन मोहोडअमरावती : टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून विभागातील १५१९ गावांतील कामांमधून १७०.१५ लाख घनमीटर गाळ उपलब्ध झाला. शेतक-यांना विनारॉयल्टी गाळ मिळाल्याने हजारो हेक्टर शेतजमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली. यामुळे शिवार समृद्ध झाले आहे.दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्य शासनाचे जलसंपदा, कृषी, लघुसिंचन, जिल्हा परिषद यांसह अन्य विभागांच्या वतीने १५१९ नदी व नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले. यापैकी ८४४ शासकीय व ३९० कामे लोकसहभागातून करण्यात आली. या सर्व कामांमधून साधारणपणे १७०.१५ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. हा गाळ शेतक-यांना विनारॉयल्टी केवळ वाहतूक खर्च सहन करून नेण्याची मुभा आहे. शेकडो वर्षांपासून नदी-नाल्यांत जमा झालेला गाळ सुपीक असल्याने विभागातील हजारो हेक्टर शेती समृद्ध होत आहे. जमिनीचा पोत सुधारण्यास या गाळामुळे मदत होत असल्याचे शेतक-यांनी सांगितले.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार, मागील दोन वर्षांमध्ये शासकीय कामांमधून ६४.२२ व लोकसहभागातून झालेल्या कामांमधून १०५.९७ लाख घनमीटर गाळ उपलब्ध झाला आहे. हा गाळ काढल्यामुळे शासकीय ५८०.१६ किमी व लोकसहभागातील १४३.४० किमी लांबीची कामे झाली आहेत. अशी एकूण ७२३.५६ किमी लांबीची कामे झालीत. याचा दुहेरी लाभ शेतक-यांना झाला. या सर्व कामांवर १५८.६९ कोटींचा निधी खर्च झालेला आहे. या कामांमुळे संबंधित गावांमधील जलस्तर वाढल्यासोबतच शेतीसाठी गाळ उपलब्ध झाल्यामुळे शिवाराची सुपीकता वाढून शेतक-यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे.जिल्हानिहाय काढलेला गाळजलयुक्तच्या ३,९६० कामांमधून १०५.९७ लाख घनमीटर गाळ उपलब्ध झाला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ३८.२१, अकोला ४७, यवतमाळ १०.७७, बुलडाणा ४२.१५ व वाशीम जिल्ह्यात १२.७२ लाख घनमीटर गाळ उपलब्ध झाला.३९६० कामांवर १५८ कोटींचा खर्चअमरावती विभागातील १५१९ गावांमधील ३,९६० कामांवर गेल्या दोन वर्षांत १५८ कोटी ६९ लाखांचा खर्च करण्यात आला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ४६.४५ कोटी, अकोला ३५.८, यवतमाळ १२.५४, बुलडाणा ४४.३२ व वाशिम जिल्ह्यात १४.५७ कोटींचा निधी खर्च झाला. विभागात सद्यस्थितीत ८१२ कामे प्रगतीत आहेत.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारAmravatiअमरावती