Severe water shortage at Thilori | थिलोरी येथे भीषण पाणीटंचाई

थिलोरी येथे भीषण पाणीटंचाई

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : नागरिकांना पाण्यासाठी करावी लागते वणवण

लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : तालुक्यातील थिलोरी येथे पाच दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात वारंवार निवेदन देऊनसुद्धा दैनंदिन पाणीपुरवठ्यासंबंधी कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
पिण्याच्या पाण्यासाठी थिलोरी ग्रामस्थांनी गावापासून पाच किलोमीटर दूर जाऊन भर उन्हात पायी जाऊन पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे. ज्याच्याकडे साधने आहेत, ते लोक ट्रॅक्टर बैलगाडी मोटारीच्या साहाय्याने पाणी आणत आहेत. तरीदेखील लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना या बाबी लक्षात असूनसुद्धा विनाकारण जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष का केले जात आहे, हाच एक मोठा प्रश्न आता सामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.
गावात वारंवार होत असलेल्या भीषण पाणीटंचाईचा गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गावातील मुख्य चौकांमध्ये बोअरच्या माध्यमातून नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी ग्रामपंचायतला गावकºयांनी निवेदन दिले. पाण्याची समस्या तातडीने सोडवावी, अन्यथा गावकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Severe water shortage at Thilori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.