शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
4
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
5
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
6
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
7
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
8
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
9
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
10
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
11
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
12
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
13
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
14
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
15
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
16
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
17
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
18
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
19
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
20
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी

कारंजा लाड येथे सातवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 20:45 IST

महाराष्ट्र राज्य शिक्षक साहित्य संघ व मासिक शिक्षकमत परिवार यांच्यावतीने सातवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन कारंजा लाड येथे विद्याभारती महाविद्यालय परिसरातील माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील साहित्यनगरीत २४ व २५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.

अमरावती : महाराष्ट्र राज्य शिक्षक साहित्य संघ व मासिक शिक्षकमत परिवार यांच्यावतीने सातवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन कारंजा लाड येथे विद्याभारती महाविद्यालय परिसरातील माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील साहित्यनगरीत २४ व २५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.अमरावती येथील ज्येष्ठ साहित्यिक शोभा रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत आ.ह. साळुंके करतील. स्वागताध्यक्ष विद्याभारती महाविद्यालयाचे प्राचार्य पृथ्वीराजसिंह राजपूत आहेत. प्रमुख उपस्थितांमध्ये लोककवी विठ्ठल वाघ, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत तिडके, उपविभागीय पोलीस अधीक्षक राजेश कावळे, प्राचार्य सुभाष गवई, पत्रकार विलास मराठे आदी उपस्थित राहणार आहेत. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी निघेल. सकाळी १० वाजता उद्घाटन सोहळ्यात ‘शिक्षकमत’ विशेषांक तसेच कवी विष्णू सोळंके यांचे ‘देखणे हे दु:ख आहे’, विजय हरणे यांचे ‘शब्दवेल’, छाया पाथरे यांच्या ‘ओंजळ’ या काव्यसंग्रहाचे, पुष्पा अतकरे याच्या ‘देशप्रेम’ व ‘देणं’ या एकांकिकांचे तसेच कल्पना उल्हे यांच्या ‘ती’चे विश्व’ या वैचारिक लेखसंग्रहाचे प्रकाशन व गुणवंतांचा गौरव करण्यात येणार आहे. तिसºया सत्रात १ ते ३ या वेळेत ‘स्त्री शिक्षण व सद्यस्थिती’ या विषयावर परिसंवाद होईल. चौथ्या सत्रात पुरुषोत्तम बोरकर यांची प्रकट मुलाखत, पाचव्या सत्रात दुपारी ४ ते ६ विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सहाव्या सत्रात रात्री ८ वाजता विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी रोजी सातव्या सत्रात सकाळी ९ वाजता कथाकथन, आठव्या सत्रात दुपारी १२ वाजता ‘मराठी भाषेचे संवर्धन व संगोपन आवश्यक’ या विषयावर परिसंवाद, नवव्या सत्रात दुपारी २ वाजता नागपूरच्या विजया मारोतकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘काव्यधारा’ कविसंमेलन व शेवटच्या सत्रात दुपारी ४ वाजता समारोपीय समारंभ, खुले अधिवेशन, मान्यवरांचे सत्कार आणि पुरस्कार वितरण आयोजित करण्यात आले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती