वय वर्षे सतरा; मोबाईल हिसकावले अठरा! मोबाईल स्नॅचिंग करणारी अल्पवयीनांची गॅंग ताब्यात

By प्रदीप भाकरे | Updated: January 25, 2025 13:13 IST2025-01-25T13:06:13+5:302025-01-25T13:13:35+5:30

Amravati : सात मोबाईलसह गुन्ह्यात वापरलेल्या चार दुचाकीदेखील जप्त, राजापेठ पोलिसांची यशस्वी कामगिरी

Seventeen years old; snatched eighteen mobile phone! | वय वर्षे सतरा; मोबाईल हिसकावले अठरा! मोबाईल स्नॅचिंग करणारी अल्पवयीनांची गॅंग ताब्यात

Seventeen years old; snatched eighteen mobile phone!

अमरावती : रात्रीच्या वेळेस रस्त्याने मोबाईलवर बोलत पायी फिरणाऱ्या लोकांच्या मागून भरधाव वेगाने बाईकने येऊन त्यांच्या हातातील मोबाईल फोन जबरीने हिसकावून पळ काढणाऱ्या आठ जणांच्या अल्पवयीनांच्या गॅंगचा राजापेठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्या आठ विधीसंघर्षित बालकांकडून ७१ हजार रुपये किमतीचे सात मोबाईल व गुन्हयात वापरलेल्या २.८० लाख रुपये किमतीची एक बाईक व तीन मोपेड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजापेठचे ठाणेदार पुनित कुलट यांच्या नेतृत्वातील डीबी स्कॉडने २३ जानेवारी रोजी ही मेगा कारवाई केली.
             

राजापेठ पोलिस ठाण्यात यंदा नोंद असलेल्या मोबाईल स्नॅचिंगच्या दोन घटनांचा तपास करत असताना महेंद कॉलनी येथील चार, शाम नगर येथील तीन व भातकुली पंचायत समिती परिसरात राहणाऱ्या एका विधी संघर्षग्रस्त बालकांनी राजापेठ व चार, फेजरपुरा पोलिस ठाण्यााच्या हद्दीतून पत्येकी चार व गाडगेनगर हद्दीतून दोन असे दहा मोबाईल फोन जबरीने चोरी केल्याबाबतची माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली. त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. तुर्तास त्यांच्याकडून सात मोबाईल व दुचाकी जप्त करण्यात आल्या असल्या तरी तपासादरम्यान मोबाईल स्नॅचिंगचे आणखी काही गुन्हे उलगडण्याची शक्यता असल्याची माहिती राजापेठ पोलिसांनी दिली. चैनीसाठी ती अल्पवयीनांची टोळी मोबाईल हिसकावत असल्याची माहितीदेखील समोर आली आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर, प्रभारी पोलीस उपायुक्त तथा सहायक पोलीस आयुक्त जयदत्त भंवर यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठचे ठाणेदार पुनित कुलट, डीबी स्कॉड प्रमुख तथा पोलिस उपनिरिक्षक मिलिंद हिवरे, हवालदार मनिष करपे, अंमलदार रवी लिखीतकर, पंकज खटे, गणराज राऊत, विजय राऊत, सागर भजगवरे यांनी ही कारवाई केली. शहर आयुक्तालयातून मोबाईल गेले होते मागील वर्षी चोरीला. पैकी केवळ ७ मोबाईल मिळाले होते.

"अल्पवयीनांची सात आठ जणांची टोळी बाईक वा मोपेडने मागून येऊन पायदळ जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल हिसकावून पळ काढत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे शहरातील विविध ठिकाणाहून त्या आठ मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचे सात मोबाईल व चार दुचाकी जप्त केल्या."

- पुनित कुुुलट, ठाणेदार, राजापेठ

Web Title: Seventeen years old; snatched eighteen mobile phone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.