मोर्शीत ऑनलाईन सात-बारा मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:29 IST2020-12-16T04:29:42+5:302020-12-16T04:29:42+5:30
उपिवभागीय अधिकारी कार्यालयात धावफोटो पी १५ मोर्शी पान ३ मोर्शी : मालमत्तेचा ऑनलाईन सात-बारा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी ...

मोर्शीत ऑनलाईन सात-बारा मिळेना
उपिवभागीय अधिकारी कार्यालयात धावफोटो पी १५ मोर्शी
पान ३
मोर्शी : मालमत्तेचा ऑनलाईन सात-बारा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी येथील पुनर्वसन कॉलनी स्थित नागरिकांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. पुनर्वसनातील काही भूखंड काही लोकांनी गरजेनुसार परवानगी काढून विकले. त्यातील प्लॉटवर प्रकल्पबाधित असलेल्या व नसलेल्यांनी घरे बांधली. मात्र, आजपर्यंत शासनाकडून मूळ प्लॉटमालक व नव्याने मालक बनलेल्यांना सात-बारा मिळालेला नाही. किंबहुना तो बनलेलाच नाही. त्याअनुषंगाने हे निवेदन देण्यात आले.
ज्या प्रकल्पबाधितांची जागा बिगर प्रकल्पगस्त वा अन्य व्यक्तींनी घेतली, त्यांच्याजवळ त्या जागेबाबत कुठलाही फेरफार नसल्याने बँकेकडून कर्ज काढायला अडचणी निर्माण होत आहेत. कुठलीही बँक कर्ज देत नाही. कुटुंबाची वाटणीपत्रे करणेसुद्धा कठीण झाले आहे. सर्वे नं.१२, १२/१, १२/२, १३/१, १४/१ मधील पुनर्वसनमधील प्लॉटचेऑनलाईन सात-बारा, एनए ऑर्डर प्राप्त करून द्यावी, अशी विनंती प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक हर्षल चौधरी, प्रवीण राऊत, किशोर बेहरे, विलास बुलबुले, मनीष पावडे, धर्मेंद्र मालवीय, प्रकाश ठाकरे, वामनराव धोटे, गोवर्धन रिठे, रवि माथनकार, शरद ठाकरे, मनोज गेडाम, अंबादास मसतकर, गौरव सोनारे यांच्यासह सर्व पुनर्वसनवासी उपस्थित होते.
------------------