रेतीची अवैध वाहतूक करणारे आठ ट्रक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:08 IST2017-09-06T23:08:35+5:302017-09-06T23:08:52+5:30
अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून कन्हान रेतीची अवैध वाहतूक करणारे आठ ट्रक जिल्हा पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव यांनी तिवसा येथील पंचवटी चौकात बुधवारी पहाटे जप्त केले.

रेतीची अवैध वाहतूक करणारे आठ ट्रक जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून कन्हान रेतीची अवैध वाहतूक करणारे आठ ट्रक जिल्हा पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव यांनी तिवसा येथील पंचवटी चौकात बुधवारी पहाटे जप्त केले.
अमरावती-नागपूर राज्य मार्गावरून कन्हान रेतीची अवैध वाहतूक सुरू आहे. मात्र, महसूल विभाग व प्रादेशिक परिवहन याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे पोलिसांनी कारवाई करीत ट्रक क्र.एम.एच.४० एन. ५७९९,एम.एच. ४० एक्स.८७५५, एम.एच.२९ टी. ९७१, एम.एच. २७ एक्स. ८९८९, एम.एच. ४० एन. ९७७७, एम.एच. २७ एक्स. ६९१७,एम.एच. ४० बी.जे. २५५६, एम.एच. ४० बी.एफ.२१२२ या क्रमांकाचे आठ ट्रक जप्त केले. पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव यांनी ही कारवाई केली. जप्त ट्रक संदर्भात तिवसा तहसील कार्यालयास माहिती देण्यात आली असून रेतीच्या मोजणीअंती ट्रकवर किती दंड आकारला जाईल, हे स्पष्ट होईल