जिल्ह्यातील सात हजार सैनिक देश रक्षणासाठी तैनात
By Admin | Updated: March 4, 2015 00:46 IST2015-03-04T00:46:12+5:302015-03-04T00:46:12+5:30
देशवासियांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे जिल्ह्यातील सात हजार सैनिक देशाच्या

जिल्ह्यातील सात हजार सैनिक देश रक्षणासाठी तैनात
राष्ट्रीय सुरक्षा दिवस विशेष : शहरात १० हजार पॅरामिल्ट्रीफोर्स
वैभव बाबरेकर ल्ल अमरावती
देशवासियांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे जिल्ह्यातील सात हजार सैनिक देशाच्या सुरक्षेसाठी सिमेवर तैनात आहेत. तसेच जिल्ह्यातील अंतर्गत सुरक्षेकरिता तब्बल १० हजार पॅरामिल्ट्रीफोर्स (अन्य सुरक्षा यंत्रणा) नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचे औचित्य साधून अमरावती जिल्ह्यातील सैनिकांचा घेतलेला हा आढावा.
देश सुरक्षित तर, नागरिक सुरक्षित जीवन जगू शकतात. देशाची सुरक्षा करणारे सैनिक देशाच्या सीमेवर २४ तास पहारा देत असल्यामुळे नागरिक सुरक्षित जीवन जगू शकतात. या सैनिकांच्या जीवनासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. शासनाकडून सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना सुविधा उपलब्ध करुन देत असल्याने सैनिक कर्तव्य चांगल्या प्रकारे बजावू शकतात. आपल्या जीवाची पर्वा न करता सैनिक २४ तास डोळ्यात तेल घालून देशवासीयांना सुरक्षा प्रदान करीत आहे. अमरावती जिल्ह्यात सात हजार सैनिक असून सद्यस्थितीत हे सर्व सैनिक देशाच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. त्यांतच अंतर्गत सुरक्षेसाठी पोलीस विभागासह अन्य काही विभागासुध्दा तैनात आहेत. मिल्ट्रीमध्ये आर्मी, नेवी व एअर फोर्स या तिन्ही यंत्रणाचा सहभाग असून अमरावती जिल्ह्यातून सात हजार सैनिक देशपातळीवर सुरक्षेसाठी तैनात आहेत.
सैनिकांना आर्थिक मदत
४देश रक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सैनिकांसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत आर्थिक मदत दिली जाते. सैनिकांना वैद्यकीय सेवा, त्यांच्या मुलांना शैक्षणिक मदत, मुलींचे विवाहासाठी मदत, माजी सैनिकांना नोकरीत १५ टक्के आरक्षण, माजी सैनिकांच्या विधवांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (६० टक्केवर गुण) अशा प्रकारची आदी आर्थिक मदत दिल्या जात आहे.
राष्ट्रीय सुरक्षा ही नागरी वस्तीपासून तर देशाच्या सीमेपर्यंत होणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रत्येकांचा सहभाग असणे गरजेचे आहे. माजी सैनिकांनी दिलेल्या योगदानाचा आदर व त्यांच्या आठवणी जपून ठेवणे हे देशवासियांचे कर्तव्य आहे. त्यांची जाणीव प्रत्येकांनी ठेवावी, तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांनीही ठेवावी.
दिनेशकुमार गोवारे,
सैनिक कल्याण संघ.