इंडिगो-व्हॅनच्या धडकेत सात जण जखमी, तीन गंभीर
By Admin | Updated: May 9, 2014 00:55 IST2014-05-09T00:55:21+5:302014-05-09T00:55:21+5:30
इंडिगो कार व मारुती व्हॅनची परस्परांमध्ये धडक होऊन सात जण जखमी झाले. यातील तीन जण गंभीर जखमी आहेत. ही घटना वरुड तालुक्यातील शहापूर (पुनर्वसन) नजीकच्या पेट्रोल पंपासमोर गुरुवारी दुपारी ४ वाजता घडली.

इंडिगो-व्हॅनच्या धडकेत सात जण जखमी, तीन गंभीर
वरुड : इंडिगो कार व मारुती व्हॅनची परस्परांमध्ये धडक होऊन सात जण जखमी झाले. यातील तीन जण गंभीर जखमी आहेत. ही घटना वरुड तालुक्यातील शहापूर (पुनर्वसन) नजीकच्या पेट्रोल पंपासमोर गुरुवारी दुपारी ४ वाजता घडली.
जखमींमध्ये मारूती व्हॅनमधील संगीता राजेंद्र गाडवे (४0), राजेंद्र सदाशिव गाडवे (५0), प्रकाश लक्ष्मण गाडवे (५0), राजेंद्र मोरचापुरे (४५), यांचा समावेश आहे. गंभीर जखमींमध्ये वसंत महादेव गाडवे (६५), सरोज विजय कुर्हेकर (४५), विजय झांबाआप्पा कुर्हेकर (५८) सर्व रा. नेरपिंगळाईयांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील खैरगाव येथे नेरपिंगळाईयेथील गाडवे कुटुंब नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराकरिता गेले होते. अंत्यसंसकार आटोपल्यानंतर हे कुटुंब मारुती व्हॅन क्र.एम.एच.-१६-एबी ९0१ या वाहनाने गावी परत जात होते. दुपारी चार वाजताच्या सुमारास शहापूर पुनर्वसन नजीकच्या पेट्रोलपंपासमोर समोरुन वरूडकडे येणारी भरधाव इंडिगो कार क्र. एम.पी.२८-सी ९५२१ चालकाचे संतुलन बिघडल्याने व्ॅहनला धडकली. या अपघातात व्हॅन उलटली तर इंडिगो कारचे चाक निखळून पडले. घटनेची माहिती वरुड पोलिसांना मिळताच ठाणेदार दिलीप गवईयांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक शैलेश शेळके, उपनिरीक्षक सुबोध वंजारी यांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी इंडिगो कारचा चालक कृष्णकुमार महेशकुमार सोहोनी (३४रा.छापाखाना जि. छिंदवाडा) याला अटक केली. कार चालक नशेत वाहन भरधाव चालवीत असल्याचे काही प्रत्यक्षदश्रींचे म्हणणे आहे.