जुळ्या शहरात सात डेंग्यू पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 05:00 AM2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:01:14+5:30

मागील २० दिवसांत हे डेंग्यू पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. शहरातील खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये हे डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. दरम्यान डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शंभर रुग्ण डेंग्यूसदृश मिळाले असून, अवघा अचलपूर तालुका डेंग्यूच्या आजाराने ग्रासला गेल्याचे चित्र आहे.

Seven Dengue positives in twin cities | जुळ्या शहरात सात डेंग्यू पॉझिटिव्ह

जुळ्या शहरात सात डेंग्यू पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देडासांसह वराहांचा सुळसुळाट : सरकारी यंत्रणेकडे एक रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर - परतवाडा या जुळ्या शहरात सात रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील काही ग्रामीण भागातील असून, वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत त्यांच्यावर औषधेपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
मागील २० दिवसांत हे डेंग्यू पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. शहरातील खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये हे डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. दरम्यान डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शंभर रुग्ण डेंग्यूसदृश मिळाले असून, अवघा अचलपूर तालुका डेंग्यूच्या आजाराने ग्रासला गेल्याचे चित्र आहे.
डेंग्यूसदृश रूग्णांमध्ये रक्तातील प्लेटलेट्स आणि डब्ल्यूआरबीसी झपाट्याने घटत आहेत. श्वेत पेशींची संख्या कमी होत आहेत. नॉन डेंग्यू व्हायरल इन्फेक्शनचे रूग्ण अधिक आहेत. अवघा तालुका तपाने फणफणत असतानाही शासकीय आरोग्य यंत्रणा यावर शिक्कामोर्तब करायला तयार नाही. खासगी पॅथॉलॉजी लॅबमधील डेंग्यू पॉझिटिव्हचे अहवाल, निष्कर्ष शासकीय यंत्रणा मात्र मानायला तयार नाही.
शासकीय स्तरावर एक डेंग्यू पॉझिटिव्ह- डेंग्यूचा वाढता प्रकोप बघता संबंधित शासकीय यंत्रणेने खासगी रूग्णलयांना प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. खासगी दवाखान्यालाही डेंग्यूसदृश किंवा डेंग्यू पॉझिटिव्ह रूग्ण उपचारार्थ दाखल झाल्यास त्याची सूचना शासकीय यंत्रणेला देण्याचे निर्देश संबंधितांना दिलेले आहेत.
यात अचलपूर शहरातील जीवनपुरा स्थित सिकंदर अली सत्तार अली नामक रूग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह निघाल्याची नोंद शायकीय यंत्रणेकडे आहे. स्थानिक पातळीवर शासकीय यंत्रणेने डेंग्यूरूग्ण सिकंदर अली सत्तार अली यांचे रक्तजल नुमने जिल्हा मलेरिया यंत्रणेकडे व तेथून ते अकोला, यवतमाळकडे पाठविले होते. यात सिकंदर अली हे डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे तपासणी अहवालात नमूद आहे. सदर अहवाल शासकीय यंत्रणेला प्राप्त झाला असून, रुग्णावर त्या पद्धतीने उपचार सुरू आहे.

‘त्या’ महिलेच्या अंत्ययात्रेत प्रत्येकाच्या तोंडावर मास्क
परतवाडा : स्वाईन फ्लूसदृश आजाराने घात केल्यामुळे दोन महिन्यांचे बाळ आईविना पोरके झाले. परतवाडा शहरातील भयानक चौक निवासी दुर्गा ऊर्फ वैशाली प्रवीण काबलिये (२५) या विवाहित महिलेचा अज्ञात तापाने २६ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात तिला शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. स्वाईन फ्लूसदृश आजराने या महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तिच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येकानेच आपापल्या नाका-तोंडावर मास्क लावल्याचे आढळून आलेत.

तिघांचे रक्तनमुने पाठवलेत
शहरातील खासगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या करजगाव येथील सुनंदा प्रदीप कोडे आणि प्रियंका मनोज आवारे आणि वरूड येथील वेदांत विजय शिरभाते नामक रूग्णांचे रक्त नमुने शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. या रूग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा शासकीय यंत्रणेला लागलेली आहे.

Web Title: Seven Dengue positives in twin cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य