शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

सेवा हमी कायद्याची गती मंदावली

By admin | Updated: December 23, 2015 00:21 IST

नागरिकांना विशिष्ट मुदतीत सरकारी सेवा दिली जावी, यासाठी कामचुकार अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद असलेला सेवा हमी कायदा शासनाने लागू केला.

अमरावती : नागरिकांना विशिष्ट मुदतीत सरकारी सेवा दिली जावी, यासाठी कामचुकार अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद असलेला सेवा हमी कायदा शासनाने लागू केला. मात्र याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे चित्र आहे. राज्यात काही दिवसांपासून (राईट टू सर्व्हिस'अ‍ॅक्ट) सेवा हमी कायदा लागू केला आहे. यात वय, राष्ट्रीयत्व, अधिवास प्रमाणपत्र, मिळकतीचे प्रमाणपत्र आदी १६० सेवा व जन्म दाखला, लग्नाचा दाखला, परवाने आदी ४३ सरकारी सेवा घरबसल्या एका क्लिकवर मिळण्याची तरतूद आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज भासणार नाही. मात्र तोकडी कर्मचारी संख्या, विविध बैठका, शासकीय योजना, त्याची अंमलबजावणी, अधिकारी व राजकीय मंत्र्यांचे दौरे यात अधिकारी व्यस्त राहतात. त्यामुळे सेवा हमी कायदा समक्षपणे राबविता येत नाही, असे कारण पुढे येत आहेत. सेवा हमी कायद्यात जाती प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व सांस्कृतिक कार्यक्रम परवाना प्रमाणित नक्कल मिळणे, प्रवर्गधारक प्रमाणपत्र, डोंगर दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र, तात्पुरता रहिवासी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जन्म नोंद दाखला व मृत्यू नोंद दाखला, हयातीचा तसेच निराधार असल्याचा दाखला, विधवा असल्याचा दाखला, दुकाने आणि अध्यापन नोंदणीबाबत दाखले ७ ते १५ दिवसांत देण्याची तरतूद आहे. कायदा सक्षमपणे राबविण्यासाठी दबाव येत असला तरी अधिकारी पातळीवर तो गतिमान होत नाही. जबाबदार अधिकाऱ्याला याअंतर्गत ५०० ते ५००० रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. राज्य सरकारने आठ वर्षांपूर्र्वी सरकारी बाबूंच्या बदल्या व दफ्तरदिरंगाईवर प्रतिबंध घालणारा कायदा केला. मात्र त्याला विरोध झाला. जुन्या कायद्यात अधिकाऱ्याला शिक्षेबाबत तरतूद नसल्याने सरकारी बाबूंवर वचक नव्हता. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सेवा हमीअंतर्गत अधिकाऱ्यांवरही कारवाईची तरदूत केली. त्याचे सर्वसामान्यांनी स्वागत केले. मात्र सरकारी बाबू मात्र अडचणीत येतील. सेवा हमी कायदा जिल्ह्यात प्रभावीपणे राबविला जात आहे. यामुळे नागरिकांना शासकीय सेवा त्वरित मिळत आहेत. मात्र ज्या विभागात या कायद्याची अंमलबजावणी करण्यात कुणीही कुचराई करीत असेल अशा अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करू.- किरण गित्ते, जिल्हाधिकारी, अमरावती.