शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेनेची धडक
By Admin | Updated: July 24, 2014 23:39 IST2014-07-24T23:39:35+5:302014-07-24T23:39:35+5:30
बुधवारी अतिवृष्टीच्या पावसामुळे बाधित शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे सर्व्हे करावे. पडझड झालेल्या घरांना सानुग्रह अनुदान व कोलमडलेला वीजपुरवठा सुरु करा, या मागण्यांसाठी गुरुवारी शिवसेनेने

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेनेची धडक
अमरावती : बुधवारी अतिवृष्टीच्या पावसामुळे बाधित शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे सर्व्हे करावे. पडझड झालेल्या घरांना सानुग्रह अनुदान व कोलमडलेला वीजपुरवठा सुरु करा, या मागण्यांसाठी गुरुवारी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार यांना सोपविले.
सलग दोन दिवस शहरासह जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्वत्र महापूर नदीकाठच्या घरांची झालेली पडझड, गावात पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत. त्यांना सानुग्रह अनुदान, शेत पिकांच्या नुकसानीचा सर्व्हे, मृत कुटुंबियांना पाच लाखांची मदत द्यावी, मृत जनावरांच्या मालकांना आर्थिक मदत करावी, नादुरुस्त झालेल्या पुलांची, रस्त्यांची डागडुजी आदी मुद्यांवर प्रशासनाने तत्काळ अंमलबजावणी करावी आणि शासन परिपत्रकाप्रमाणे तत्काळ मदत करावी, तसेच सर्व नुकसानीचे पंचनामे करुन शासनाकडे अहवाल पाठवून नुकसानग्रस्त नागरिकांना भरीव आर्थिक मदत द्यावी, आदी मागण्यांबाबत तातडीने उपाययोजना करुन न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय बंड, नाना नागमोते, अमोल निस्ताने, आशिष धर्माळे, प्रवीण अळसपुरे, राहुल माटोडे, गजानन डोंगरे, अनिल नंदनवार, श्रीनिवास सरडे, पवन लुंगे, अनिल मोहोड, अविनाश सनके, धर्मेद्र मेहरे, सुरेश उताणे, अतुल थोटांगे, उमेश घुरडे, अशोक कैथवास, सचिन पिंजरकर, साहेबराव चौधरी, रवी सावरकर, विश्वास बुरघाटे, गोवर्धन अलोने, गंगाधर तरारे, प्रमोद कांबळे आदींचा सहभाग होता.