वरुडात वंचित बहुजन आघाडीचे अर्धदफन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:16 IST2021-09-06T04:16:00+5:302021-09-06T04:16:00+5:30

सफाई कामगारांच्या मागण्यांकडे वेधले लक्ष, महिलांचाही सहभाग वरूड : सफाई कामगाराच्या विविध मागण्यांकरिता नगर परिषदेला अनेक वेळा निवेदन देऊनसुद्धा ...

Semi-burial movement of deprived Bahujan Front in Waruda | वरुडात वंचित बहुजन आघाडीचे अर्धदफन आंदोलन

वरुडात वंचित बहुजन आघाडीचे अर्धदफन आंदोलन

सफाई कामगारांच्या मागण्यांकडे वेधले लक्ष, महिलांचाही सहभाग

वरूड : सफाई कामगाराच्या विविध मागण्यांकरिता नगर परिषदेला अनेक वेळा निवेदन देऊनसुद्धा दखल घेतली नसल्याने वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नगर परिषद प्रांगणात अर्धदफन आंदोलन करण्यात आले. यामध्ये सफाई कामगार महिलासुद्धा सहभागी झाल्या होत्या.

सफाई कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्व सफाई कामगारांना नियमित रोजगार, वेळेवर मासिक वेतन, वेतनामधे वार्षिक वाढ यांचा समावेश होता. नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना याबाबत वेळोवेळी निवेदन दिले. आमरण उपोषणसुद्धा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आले होते. मुख्याधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करून लेखी आश्वासन दिले होते. परंतु, अद्यापही मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने अखेर नगर परिषद प्रांगणात सफाई कामगारांसह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव सुशील बेले यांनी खड्ड्यामध्ये अर्धदफन आंदोलन केले. अखेर मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी ठेकेदाराला नोटीस देऊन सफाई कामगारांना कामावर घ्या, अन्यथा ठेका रद्द करू, असे पत्र दिले. सफाई कामगारांना न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी राहुल बिनातकर, कुणाल बेसरे, आकाश बेसरे, राज रगडे, रोहन गुरवे, अभिजित शिंगारे, अनिकेत नरहरे आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे आणि सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Web Title: Semi-burial movement of deprived Bahujan Front in Waruda