राज्यस्तरावर ४२ मॉडेल, पोस्टरची निवड; अमरावती विद्यापीठात आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 18:40 IST2020-01-16T18:40:37+5:302020-01-16T18:40:58+5:30
नवसंशोधकांच्या कल्पनाशक्तीचा ‘आविष्कार’

राज्यस्तरावर ४२ मॉडेल, पोस्टरची निवड; अमरावती विद्यापीठात आयोजन
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठस्तरीय ‘आविष्कार’ स्पर्धा मंगळवारी पार पडली. यात ४२ मॉडेल आणि पोस्टरची राज्यस्तरावर निवड झाली असून, नवसंशोधकांची ही उंच भरारी मानली जात आहे.
‘आविष्कार’ स्पर्धेत विद्यापीठस्तरीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मॉडेल, पोस्टर सादरीकरणातून सामाजिक, आरोग्य, विकास, पायाभूत सुविधा, कृषी, पाणी, विज्ञान, सांडपाणी, विद्युत असे विविधांगी प्रश्न, समस्या या विषयांवर लक्ष वेधले. या स्पर्धेत विभागातून ३१४ स्पर्धकांनी सहभागासाठी नोंदणी केली होती, त्यापैकी प्रत्यक्षात २५१ विद्यार्थ्यांनी मॉडेल, पोस्टरचे सादरीकरण के ले. परीक्षकांच्या निर्णयाअंती ४२ नवसंशोधकांची राज्यस्तरावर मुंबई विद्यापीठात २८ ते ३१ जानेवारी दरम्यान होणाºया ‘आविष्कार’ स्पर्धेकरिता पोस्टर, मॉडेलची निवड झाली आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, रसायनशास्त्र विभागप्रमुख आनंद अस्वार आदींनी नवसंशोधकांच्या ‘आविष्कार’बाबत समाधान व्यक्त केले.
या नवसंशोधकांना मिळाली संधी
कुणाल गावंडे, राधिका तायवाडे, अमरीन अलीम कुरेशी, विनोद पाटील, मो.व्ही. नसीम, स्मीता रक्षीत, अमृत गड्डमवार, अमित मोहोड, भावेश श्रीराव, कीर्ती गुल्हाने, प्रतीक्षा लाहोटे, भाग्यश्री गुल्हाने, कृणाल पनपालिया, अभिनंदन कोल्हे, प्रथमेश निकम, यश गुप्ता, अक्षय वºहेकर, रश्मी काळे, मोनाली टिंगणे, वृषभ डहाके, योगिता धोटे, सागर दुबे, शिवप्रसाद ढगे, श्रद्धा आखरे, सचिन देशमुख, प्रवीण सरदार, प्रसाद देशमुख, किरण तायडे, अनुराज चव्हाण, युवराज सोनी, अक्षय चवरे, प्रियंका गायकवाड, एस.एन. खाडे, आशिष बुरंगे, एस.के . रेहान, प्रणव ढाकुलकर, सुप्रिया शेंडे, अमोल झाडे, अर्चना व्यास, अमितकुमार रणीत, संदीप अवचार या नवसंशोधकांना राज्यस्तरावर संधी मिळाली आहे.