अमरावतीत कोट्यवधींच्या गुटख्याची विल्हेवाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 18:55 IST2018-10-10T18:49:09+5:302018-10-10T18:55:13+5:30
2013 पासून जप्त केलेल्या गुटख्याची विल्हेवाट

अमरावतीत कोट्यवधींच्या गुटख्याची विल्हेवाट
अमरावती: राज्यात गुटखाबंदी लागू झाल्यानंतर तंबाखूजन्य गुटखा पदार्थांच्या जप्तीवर भर देण्यात आला. अमरावती जिल्ह्यात २०१३ सालापासून जप्त करण्यात आलेल्या गुटखा पुड्यांची विल्हेवाट आज लावण्यात आली. नांदगावपेठ एमआयडीसीतील एका कंपनीत गुटख्यांच्या पुड्या आगीच्या स्वाधीन करण्यात आल्या. तब्बल अडीच कोटींच्या गुटखा पुड्यांची पुढील चार दिवसांत होळी केली जाईल. त्यापैकी ७५ लाखांचा गुटखा आज जाळण्यात आला, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.