५० ग्रॅम गांजा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:29 IST2020-12-16T04:29:34+5:302020-12-16T04:29:34+5:30
भरधाव वाहनचालकाविरुद्ध गुन्हा अमरावती : इतरांना धोका पोहचविण्याच्या बेताने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या काली-पिलीच्या चालकाविरुद्ध वलगाव पोलिसांनी भादंविचे ...

५० ग्रॅम गांजा पकडला
भरधाव वाहनचालकाविरुद्ध गुन्हा
अमरावती : इतरांना धोका पोहचविण्याच्या बेताने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या काली-पिलीच्या चालकाविरुद्ध वलगाव पोलिसांनी भादंविचे कलम २७९ अन्वये गुन्हा दाखल केला. हा प्रकार वलगाव येथे घडला. फुरखान अहमद अब्दूल (२८, कुरेशी मोहल्ला पूर्णानगर) असे आरोपीचे नाव आहे. अन्य एका घटनेत वसीम खान अनिस खान (३०, रा. सुफियाननगर नं. २) विरुद्ध कलन २७९ अन्वये गुन्हा नोंदविला.
-----------------
५०० रुपये खंडणीसाठी दुकान फोडण्याची धमकी
अमरावती : ५०० रुपयांची खंडणीची मागणी करणाऱ्याला नकार दिला असता, दुकान फोडण्याची धमकी दिल्याची घटना स्थानिक सराफ बाजारातील देना बँकेजवळ घडली. गोपाल रामकिसन अरोरा (३८, रा. सराफा बाजार) यांच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपी राणू छांगाणी (३८, रा. माताखिडकी) विरुद्ध गुन्हा नोंदविला.