शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
2
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
4
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
5
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
6
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
7
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
8
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
9
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
10
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
11
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
12
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
13
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
14
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
15
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
16
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
17
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
18
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
19
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
20
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

मुलीचा मृतदेह शवगृहात पाहून आईने फोडला हंबरडा; मृत विवाहितेच्या पतीसह महिलेविरुद्ध गुन्हा

By प्रदीप भाकरे | Updated: November 8, 2022 14:27 IST

विष पाजून मारण्याचा आरोप

अमरावती : आदल्या दिवशीच मुलीला माहेरी घेऊन आले असते, तर पोरीचा जीव वाचला असता, अशा हृद्यभेदी शब्दात रूदन करत पोटच्या लेकीचे पार्थिव पाहून मातेने हंबरडा फोडला. शवागृहातील त्या मातेचा गहिवर पाहून उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा देखील पाणावल्या. जिल्हा सामान्य रुग़्णालयातील शवागृहात ७ नोव्हेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास हृद्य पिळवळून टाकणारी ती घटना उघड झाली.

मुलीला तिचा पती व एका महिलेनेच विषारी द्रव्य पाजून मारून टाकल्याचा आरोप करत ते दोघेच आपल्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असल्याची तक्रार मृत विवाहितेच्या आईने ७ नोव्हेंबर रोजी दुपारी गाडगेनगर पोलीस ठाण्यात नोंदविली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विलास विजय रामटेके व एक महिला (दोघेही रा. विलासनगर) यांच्याविरूध्द काैटुंबिक छळ तथा आत्महत्येस चिथावणी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारकत्या महिलेच्या मुलीचा आरोपी विलाससोबत प्रेमविवाह झाला होता. परंतू विलास हा तिला (पत्नीला) बेदम मारहाण करायचा. तथा विलासच्या घरातील एक महिला देखील तिचा शारीरिक मानसिक छळ करीत होती. हा सर्व प्रकार तिने आईच्या कानी घातला होता. दरम्यान ६ नोव्हेंबर रोजी पहाटे आरोपी विलासने साळीच्या मोबाईलवर कॉल करत तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन जा, असे सुचविले. कामाहून परत आल्यावर जावयाचा फोन कॉल आल्याची माहिती लहान मुलीने आईला दिली.

तुमची मुलगी मरण पावली

दरम्यान, ७ नोव्हेंबर रोजी पहाटे २.०९ मिनिटांनी विलास रामटेके याने साळीच्या मोबाईलवर कॉल करत तुमची मुलगी मरण पावल्याची माहिती सासुला दिली. मी तुम्हाला घ्यायला येतो, असेही तो म्हणाला. मात्र मृताच्या आईने त्यास नकार दिला. ती सकाळी आठच्या सुमारास शवागृहात पोहोचली असता, तिला मुलीचा मृतदेहच दिसून आला. तुमच्या मुलीने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती आरोपी विलासने सासुला दिली. मात्र मुलीला विलास व एका महिलेनेच आत्महत्या करण्यास चिथावणी दिल्याचा आरोप करत महिलेने दुपारी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती