शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सुरक्षा यंत्रणेकडून कुरियर सेवा दुर्लक्षित; घातपातासाठी वापर होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 21:03 IST

राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आले असताना घातपाती कारवायांसाठी कुरियर सेवेचा वापर होण्याची शक्यता आहे. मात्र, सुरक्षा यंत्रणेकडून कुरियर सेवा दुर्लक्षित असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपार्सल, बॉक्स, साहित्याची बिनदिक्कत ने-आण

गणेश वासनिकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आले असताना घातपाती कारवायांसाठी कुरियर सेवेचा वापर होण्याची शक्यता आहे. मात्र, सुरक्षा यंत्रणेकडून कुरियर सेवा दुर्लक्षित असल्याचे चित्र आहे. आजमितीला कुरियर सेवेद्वारे कोणत्याही प्रकारचे पार्सल, गिफ्ट बॉक्स आणि साहित्य बिनदिक्कत पाठविण्याची मुभा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.काश्मिरातील पुलवामा येथील सीआरपीएफ वाहनांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. त्यानंतर भारत- पाकिस्तान या दोन देशात युद्धजन्य आणि तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान गुप्तचर यंत्रणेने अतिरेकी कारवाया होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्याअनुषंगाने राज्यात गत आठवड्यात हाय अलर्ट जारी केले आहे. गर्दीचे स्थळ, रेल्वेस्थानक, बसस्थानक, मंदिर, मशिद, मॉल, मुख्य चौकांची सुरक्षा यंत्रणेकडून कसून तपासणी केली जात आहे. गत आठवड्यात येथील बॉम्ब शोधक व नाशक पथकाने घातपाती कारवाया होण्याच्या पार्श्वभूमीवर महानगरातील मुख्य परिसर पिंजून काढला. तथापि, सर्वत्र सुरक्षा जोपासली जात असताना मात्र कुरियर सेवेकडे पोलीस, गुप्तचर यंत्रणा, विशेष शाखा, रेल्वे सुरक्षा दल व अन्य सुरक्षा यंत्रणांनी दुर्लक्ष चालविले आहे. करियर सेवा प्रतिष्ठानातून कोणत्याही प्रकारचे साहित्य, वस्तू, पार्सल किंवा गिफ्ट बॉक्स मर्जीनुसार पाठविता येत असल्याचा अनुभव शुक्रवारी आला. त्यामुळे गैरप्रकार अथवा घातपाती कारवाया करण्याच्या हेतुने कुरियर सेवेचा वापर होऊ शकते, असे चित्र आहे. शहरातील सर्वच कुरियर सेवेच्या प्रतिष्ठांनामध्ये पैसे मोजा आणि काहीही पाठवा, असे एकंदर चित्र आहे.रेल्वे, खासगी वाहनातून सेवाकु रियर सेवेतून त्वरेने काहीही पाठविता येते, अशी सुविधा हल्ली उपलब्ध आहे. त्यामुळे अनेकांनी डाकसेवेपेक्षा कुरियर सेवेला प्राधान्य दिले आहे. मात्र, अलीकडे अतिरेकी कारवाया धमकीच्या पार्श्वभूमीवर कुरियर सेवांवर बंधन लादणे काळाची गरज आहे, अन्यथा अतिरेकी कु रियरद्वारे बॉम्ब, स्फोटक पदार्थ एका शहरातून दुसऱ्या शहरात सहजतेने पाठवू शकतील.पोत्यातून होते कुरियर पार्सलरेल्वे गाड्यातून पोत्यातून कुरियर पार्सल, गठ्ठे पाठविले जातात. कुरियर प्रतिष्ठानातून दरदिवशी मुंबईकडे कर्मचारी प्रवासी रेल्वेतून या पोत्याची ने-आण करतात. त्यासाठी एका किंवा दोन कर्मचारी नियुक्त केले जातात. रेल्वे गाड्यांतून ही सेवा बिनदिक्कतपणे सुरू असताना धोकादायक प्रकार रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल किंवा रेल्वे पोलिसांनी पुढाकार घेतला नाही. रेल्वे गाड्यातून पोत्याद्वारे कुरियर पार्सल, बॉक्स आदी साहित्य वर्षानुवर्षे ने-आण केली जात आहे.कुरियर सेवेसाठी ओळखपत्र लागत नाही. मात्र, ग्राहकांकडून काय पार्सल पाठविले जात, याविषयी शंका आल्यास ते तपासूनच स्वीकारले जाते. सुरक्षाविषयी काळजी घेतली जाते.- हिंमत जामनिक,कुरियर कर्मचारी, अमरावतीशासकीय कुरियर सर्व्हिसमध्ये सगळ्या बाबींची शहानिशा केली जाते. खासगी क्षेत्रातील पार्सल सुविधेसंबंधी तपासणी करण्याबाबत सूचना दिली जाईल.- संजयकुमार बावीस्कर,पोलीस आयुक्त, अमरावती

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी