इर्विनमधील ऑक्सिजन लिक्विड टँक ऑपरेटची जबाबदारी सुरक्षा रक्षकाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:12 IST2021-04-03T04:12:06+5:302021-04-03T04:12:06+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात १५ डिसेंबर २०२० रोजी ऑक्सिजन टँकची उभारणी झाली. मात्र, कनेक्शन जोडणीचे काम थांबल्यानंतर लोकमतने यासंदर्भात वृत्त ...

इर्विनमधील ऑक्सिजन लिक्विड टँक ऑपरेटची जबाबदारी सुरक्षा रक्षकाकडे
जिल्हा सामान्य रुग्णालयात १५ डिसेंबर २०२० रोजी ऑक्सिजन टँकची उभारणी झाली. मात्र, कनेक्शन जोडणीचे काम थांबल्यानंतर लोकमतने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर ३० जानेवारी रोजी एजन्सीमार्फत कामाचा मुहूर्त साधण्यात आला. जेमतेम काम पूर्ण झाल्यानंतर बुधवार, ३१ मार्च रोजी लिक्विड टँकमधून ऑक्सिजन निर्मितीची प्रक्रिया सुरू करून वार्डात त्याचा पुरवठा सुरू करण्यात आला. सदर एजन्सीमार्फत येथील कर्मचाऱ्यांना तात्पुरते प्रशिक्षण देऊन टँकच्या मीटरमधील बदलांसदर्भात भीतीयुक्त प्रक्रिया जाणवल्यास एजन्सीला संपर्क करण्याचे सुचविण्यात आले आहे. औरंगाबादहून अमरावतीला येण्याकरिता ६.३० तासांचा अवधी लागतो. मात्र, कंपनीद्वारा काही बिघाड झाल्यास आमचा माणूस त्वरित रवाना केला जातो, असे तेथील व्यवस्थापकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
बॉक्स
टँकच्या मीटरकडे विशेष लक्ष
लिक्विड टँकमधून ऑक्सिजन टँकमध्ये लिक्विड सप्लाय होऊन ऑक्सिजनची निर्मिती होते. ते ऑक्सिजन रुग्णांपर्यंत पोहचविले जाते. टँकला छोटा मीटर बसविण्यात आले आहे. त्यातील प्रेशर किमान ८ व कमाल १२ वर काटा असावा, याबाबत एजन्सीमार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. आउटर आणि सेफ्टी वॉलसंबंधित हे प्रशिक्षण होते. त्यात बिघाड झाल्यास व्हिडीओ कॉल किंवा ग्रुपवर मेसेजची सुविधा एजन्सीने केली आहे. इमर्जंसीत ते थेट माणूस पाठवित असल्याचे सांगण्यात आले.
गुरुवारी मध्यरात्री उडाला गोंधळ
अनुचित घटना घडू नये, यासाठी सुरक्षा रक्षकांची नजर त्या मीटरकडेच असते. गुरुवारी रात्री २ वाजता दरम्यान असाच काही प्रकार घडला नि सुरक्षा रक्षकांमध्ये भीती निर्माण झाली. त्यांनी लगेचच संबंधित सुपरवायझरशी रात्री फोन कॉल करून संकट निवारल्याची माहिती आहे.
कोट
सदर एजन्सीकडे ९ काँट्रॅक्ट आहेत. अकोला, अमरावती, जळगाव, अंबेजोगाई आणि औरंगाबादेतील पाच ठिकाणी ही कामे केली जात आहे. प्रत्येकांशी ग्रुपच्या माध्यमातून संपर्क असतो. काहीही बिघाड झाल्यास ऑपरेटिंगची माहिती दिली जाते. वेळप्रसंगी माणूसही पाठवितो.
- वेणुगोपाल झंवर, व्यवस्थापक, सागर एजन्सी, औरंगाबाद
कोट
टँकमध्ये तयार होणाऱ्या गॅसचे प्रेशर पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. किमान आणि कमाल मर्यादावर लक्ष ठेवण्याचे प्रशिक्षण येथील सुरक्षा रक्षकांना देण्यात आले आहे. तेच सध्या ऑक्सजन टँक ऑपरेट करीत आहे.
- योगेश वाडेकर,
फार्मासिस्ट, इर्विन रुग्णालय