शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सहायक बीडीओंच्या हाती गोपनीय अहवालाची चावी

By admin | Updated: November 9, 2014 22:25 IST

पंचायत समिती स्तरावरील कृषी, समाजकल्याण, महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या नोंदी घेण्याची जबाबदारी शासनाने आता सहायक

अमरावती : पंचायत समिती स्तरावरील कृषी, समाजकल्याण, महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या नोंदी घेण्याची जबाबदारी शासनाने आता सहायक गटविकास अधिकाऱ्यांकडे सोपविली आहे. सहायक बीडीओंच्या कामांच्या वाटपामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी शासनाने ३० आॅक्टोबर रोजी आदेश जारी केले आहेत. त्यानुसार सहायक बीडीओंच्या कामांची तीन भागांत विभागणी करण्यात आली आहे. पंचायत समिती स्तरावर कामात सुसूत्रता आणण्यासाठी तसेच कामकाजाची विभागणी करण्यासाठी राज्य शासनाने दीड वर्षांपूर्वी सहाय्यक बीडीओचे पद निर्माण केले. यासाठी राज्यात ३५१ पदे निर्माण करण्यात आली. त्या कामांबाबत मार्गदर्शक सूचनादेखील त्यावेळी देण्यात आल्या होत्या. मात्र, बहुतांश पंचायत समितींमध्ये सहायक बीडीओंच्या कामांमध्ये एकसूत्रता नसल्याच्या तक्रारी सरकारला प्राप्त झाल्यात. कामांचे वाटप सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून विभाग, जिल्हा व गट स्तरावरील कामे वाटपाबाबत प्रस्ताव मागविण्यात आले. त्या प्रस्तावाची विभाग स्तरावरून तपासणी करून सहायक बीडीओंच्या कामे वाटपाचा सुधारित आदेश ३० आॅक्टोबरला जारी करण्यात आला. पंचायत समिती स्तरावरील सर्व आस्थापनांविषयक बाबी, पंचायत समितीचा अर्थसंकल्प तयार करणे, पंचायतराज समितीचा अनुपालन अहवाल, लोकसेवा समितीचा अनुशासन अहवाल, ग्रामपंचायतीच्या कायदेशीर बाबी, ग्रामपंचायतीच्या मासिक सभा, ग्रामपंचायतींचे संनियंत्रण, म.गांधी ग्रामीण रोजगार योजना, यशवंत पंचायतराज योजना, पंसस्तरावरील कायदेशीर बाबी, सहायक बीडीओंमार्फत गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे नवीन निर्बंध नवीन आदेशान्वये घालून देण्यात आले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विभागीय स्तरावर उपायुक्त (आस्थापना) आणि जिप.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)