जीवनाच्या उत्तरार्धातही जपले समाजभान

By admin | Published: April 20, 2017 12:18 AM2017-04-20T00:18:11+5:302017-04-20T00:18:11+5:30

संपूर्ण जीवनात शेतकऱ्यांच्या मदतीला धावणारे हात सरत्या आयुष्यात लेखणीचा आधार घेऊन सामाजिक बांधिलकी जपत आहेत.

In the second half of life, | जीवनाच्या उत्तरार्धातही जपले समाजभान

जीवनाच्या उत्तरार्धातही जपले समाजभान

Next

आदर्श : धामणगावच्या दोन वृद्धांची प्रेरणादायी सेवा
मोहन राऊत धामणगाव रेल्वे
संपूर्ण जीवनात शेतकऱ्यांच्या मदतीला धावणारे हात सरत्या आयुष्यात लेखणीचा आधार घेऊन सामाजिक बांधिलकी जपत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेत येणाऱ्या वृद्ध शेतकऱ्यांना बँकेच्या कामात मदत करण्याचा वसा या दोन्ही शेतकऱ्यांनी घेतला आहे.
जुना धामणगाव येथील या दोन शेतकऱ्यांची नावे आहेत मनोहर नामदेव तायडे व ज्ञानेश्वर गोठाणे. वृद्ध शेतकऱ्यांसह नागरिकांना मदत व्हावी, या उद्देशाने उपरोक्त शेतकऱ्यांची जोडगोळी अमरावती जिल्हा मध्यवर्त्ती सहकारी बँकेसमोर बसून बँकेत येणाऱ्या वृद्धांना बँकेच्या स्लिप भरून देणे, पासबुकमध्ये एन्ट्री करून देणे, त्यांच्या खात्यातील रकमेचा हिशेब समजावून सांगणे आदी कामे ते करीत आहेत. मनोहर तायडे व ज्ञानेश्वर गोठाणे यांनी मागील अनेक पणन् महासंघात कर्मचारी म्हणून जबाबदारी सांभाळली. नामदेव यांना दोन मुले. घरची आर्थिक स्थिती ठिकठाक असली तरी निरक्षर शेतकऱ्यांना मदत देण्याच्या उद्देशाने ते ही सेवा अविरत देत आहेत. ज्ञानेश्वर गोठाणे यांना एक मुलगा आहे़ परंतु समाजऋण फेडण्याच्या उद्देशाने संजय गांधी निराधार योजनेचे मानधन घेण्यासाठी येणाऱ्या वृद्ध लाभार्थ्यांना मदत करण्याचे काम ते करीत आहेत. यादोन्ही वृद्धांना शेतकरी, लाभार्थी स्वेच्छेने दोन-पाच रूपये देतात. या पैशांमधून ग्रामीण भागातून आलेल्या वृद्धांना चहा पाजण्याचे कामही हे दोघे करतात़ निराधार योजनेचे मानधन घेण्यासाठी एखादा वृद्ध लाभार्थी आला नाही तर त्याची हे दोघे आस्थेने चौकशी करतात. बँकेसमोर बसून निरक्षरांना मदत करण्यात यादोघांना मोठा आनंद होतो़ आयुष्याच्या उत्तरार्धातही त्यांनी जपलेले समाजभान वाखाणण्यासारखे आहे.

Web Title: In the second half of life,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.