शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रेड्डी यांच्या कार्यालयातील कागदपत्रांचे सर्चिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 05:00 IST

मेळघाटातील हरिसाल येथे मुंबई येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनात २१ ते २४ एप्रिल असे चार दिवस या चमूने दीपाली प्रकरणाशी धागेदोरे असलेली कागदपत्रे, कर्मचारी-अधिकाऱ्यांचे बयाण नोंदविले. निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी दीपाली चव्हाण यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याबाबतच्या आवक-जावक विभागातील नोंदी पथकाने तपासल्यात.

ठळक मुद्देआयपीएस चौकशी पथक दाखल, सुसाईड नोटवर फोकस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डींच्या भूमिकेची चौकशीसाठी अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली गठित चार सदस्यीय चौकशी पथक रविवारी दुपारी अमरावतीत दाखल झाले. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील काही कागदपत्रांची पथकाने तपासणी केली तसेच तेथील शासकीय विश्रामगृहात तिघांचे बयाण नोंदविण्यात आले.मेळघाटातील हरिसाल येथे मुंबई येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनात २१ ते २४ एप्रिल असे चार दिवस या चमूने दीपाली प्रकरणाशी धागेदोरे असलेली कागदपत्रे, कर्मचारी-अधिकाऱ्यांचे बयाण नोंदविले. निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी दीपाली चव्हाण यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याबाबतच्या आवक-जावक विभागातील नोंदी पथकाने तपासल्यात. रविवार सुटीचा दिवस असतानासुद्धा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे कार्यालय या चौकशी पथकासाठी उघडण्यात आले होते. यावेळी कार्यालय अधीक्षक व्ही.पी. चव्हाण, आस्थापना विभागाचे विक्रम राय, आवक-जावक  कर्मचारी संजय दुर्गे आदींनी या पथकाला कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सहकार्य केले. आयपीएस प्रज्ञा सरवदे यांचे चौकशी पथक हे दीपाली यांनी चार पानी सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या बाबीवर चौकशीच्या अनुषंगाने फोकस करीत आहेत. हे पथक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर कायदेशीर कारवाईसंदर्भात चौकशी करीत आहे. या पथकाने सदस्यांनी एकाच वेळी बयाण नाेंदविले व कागदपत्रांची पडताळणी केली. रेड्डी यांच्या शासकीय बंगल्याची झाडाझ़डती सोमवारी घेण्यात येईल.  

दीपाली यांच्या पतीचे नोंदविले बयाणआयपीएस प्रज्ञा सरवदे यांचे चौकशी पथकातील पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी रविवारी सायंकाळी ४.३० वाजता दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांचे बयाण नोंदविले. सुसाईड नोटमध्ये असलेल्या मुद्द्यांवर काही प्रश्नांना अनुसरून राजेश माेहितेंकडून माहिती घेतली. वनपाल-वनरक्षक कर्मचारी संघटनेचे इंद्रजित बारस्कर, प्रदीप बाळापुरे यांचेही बयाण नोंदविले. 

आयपीएस प्रज्ञा सरवदे आज अमरावतीतवनमंत्रालयाने दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी प्राथमिक चौकशी करण्यासाठी अपर पोलीस महासंचालक व सह व्यवस्थाकीय संचालक प्रज्ञा सरवदे यांच्यावर धुरा सोपविली आहे. आयपीएस प्रज्ञा सरवदे यांचे चार सदस्यीय चौकशी पथक दाखल झाले. सरवदे या २६ एप्रिल रोजी उशिरा सायंकाळी अमरावती येथे पोहोचणार असून, मंगळवारी सकाळी ८ नंतर त्या हरिसालकडे रवाना होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाणforest departmentवनविभाग