शहरातील सात रेस्टाॅरेंट सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:10 IST2021-07-21T04:10:54+5:302021-07-21T04:10:54+5:30
अमरावती : शहरात रात्री आठनंतर सुरू असलेले सात रेस्टाॅरेंट सोमवारी रात्री सील करण्यात आले. पोलीस व महापालिकेच्या पथकाद्वारे ...

शहरातील सात रेस्टाॅरेंट सील
अमरावती : शहरात रात्री आठनंतर सुरू असलेले सात रेस्टाॅरेंट सोमवारी रात्री सील करण्यात आले. पोलीस व महापालिकेच्या पथकाद्वारे संयुक्तपणे ही कारवाई केली. ही रेस्टाॅरेंट सुरू ठेवून तेथे ग्राहक भोजन करताना आढळून आले. यामध्ये राजापेठ पोलीस ठाणे परिसरातील सुदर्शन बिल्डिंगजवळील घरोंदा रेस्टाॅरेंट येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या उपस्थितीत तसेच सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या परिसरातील मुरली मनोहर रेस्टाॅरेंट, कन्हैया रेस्टाॅरेंट, गुजरात कांतिभुवन, अल बशीर रेस्टॉरेंट, अल हयात रेस्टॉरेंट व हॉटेल अब्दुल्लाह वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या उपस्थितीत सील करण्यात आले. या कारवाईत बाजार परवाना विभागाचे निरीक्षक आनंद काशीकर यांच्या नेतृत्वात अमर सिरवानी, चंद्रशेखर ताकपीठे, शुभम चोमडे, सागर अठोर यांच्या पथकाचा समावेश होता.