नियमांचे पालन होत नसल्यास आस्थापना सील करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:13 IST2021-02-14T04:13:20+5:302021-02-14T04:13:20+5:30

उपाययोजना, आढावा बैठकीत महापौरांनी सुनावले अमरावती : शहरातील मार्केटमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत नसेल, तर अशा सर्व बाजारपेठांवर ...

Seal the establishment if the rules are not followed | नियमांचे पालन होत नसल्यास आस्थापना सील करा

नियमांचे पालन होत नसल्यास आस्थापना सील करा

उपाययोजना, आढावा बैठकीत महापौरांनी सुनावले

अमरावती : शहरातील मार्केटमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत नसेल, तर अशा सर्व बाजारपेठांवर दंडात्मक कारवाई व प्रसंगी ते सील करण्याचे निर्देश महापौर चेतन गावंडे यांनी शनिवारी दिले. महापालिकेत आढावा सभेत ते बोलत होते.

मंगल कार्यालयांमध्ये नियमांचे पालन होत नसल्यास अशा मंगल कार्यालयाचे संचालक व आयोजकांवर दंडात्मक कारवाई करावी. काही भागात, कार्यालयात, व्यापारी प्रतिष्ठाने, मॉल आदी ठिकाणी कोरोनाग्रस्त आढळल्यास, संबंधितांचे स्वॅब घेण्यात यावे. मॉलमध्ये कपडे ट्रायल व बदलवणे यावर प्रतिबंध करावे तसेच थर्मल गन व सॅनिटायझरचा वापर करावा, असे निर्देश महापौरांनी दिले.

बैठकीला उपमहापौर कुसुम साहू, स्थायी समिती सभापती राधा कुरील, आयुक्त प्रशांत रोडे, सभागृहनेता सुनील काळे, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, नगरसेवक विलास इंगोले, प्रकाश बनसोड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे, महेंद्र गुढे, ए.टी. देशमुख, अनिल रोहणकर, पी.आर. सोमवंशी, रवींद्र कलोडे, विजय बख्तार ही डॉक्टर मंडळी उपस्थित होती.

Web Title: Seal the establishment if the rules are not followed