अचलपूरचे एसडीओ सोशल मीडियापासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:16 AM2021-09-04T04:16:43+5:302021-09-04T04:16:43+5:30

परतवाडा : अचलपूरचे एसडीओ तीस दिवसांसाठी सोशल मीडियापासून दूर राहणार आहेत. नो सोशल मीडिया हे चॅलेंज त्यांनी स्वीकारले आहे. ...

SDO of Achalpur away from social media | अचलपूरचे एसडीओ सोशल मीडियापासून दूर

अचलपूरचे एसडीओ सोशल मीडियापासून दूर

googlenewsNext

परतवाडा : अचलपूरचे एसडीओ तीस दिवसांसाठी सोशल मीडियापासून दूर राहणार आहेत. नो सोशल मीडिया हे चॅलेंज त्यांनी स्वीकारले आहे. २ ऑक्टोबरपर्यंत ते सर्व व्हाॅट्स ॲप ग्रुपमधून लेफ्ट झाले आहेत. या काळात ते एक महिना सोशल मीडिया सोडून पुस्तक वाचनासह इतर छंद जोपासणार आहेत. यादरम्यान कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी व्हाॅट्सॲपवर वैयक्तिकरीत्या ते उपलब्ध राहणार आहेत. कारण व्हॉट्सॲप पूर्णपणे बंद करणे अशक्य असल्याचे अचलपूरचे एसडीओ संदीप कुमार अपार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, एक महिन्याकरिता सोशल मीडियापासून दूर राहणाऱ्या एसडीओ संदीपकुमार अपार यांनी इतरांनासुद्धा सोशल मीडियापासून दूर राहण्यास सुचविले आहे. आपण एक महिना सोशल मीडिया सोडून पुस्तक वाचन किंवा इतर छंद जोपासून पहा. आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांना कृत्रिम मेसेज पाठविण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटा. फोनवर बोला. जीवन नक्कीच अर्थपूर्ण होईल, असा सल्लाही त्यांनी इतरांना दिला आहे.

दिनांक03/09/21 फोटो संदीप कुमार अपार यांचा.

Web Title: SDO of Achalpur away from social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.