स्क्रब टायफसची एन्ट्री; जिल्ह्यात अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:57 AM2018-08-31T00:57:06+5:302018-08-31T00:58:12+5:30

डेंग्यू, स्वाइन फ्लूसारख्या संसर्गजन्य आजारांनी आधीच अमरावतीकरांचा जीव मेटाकुटीस आला असताना, ‘स्क्रब टायफस’ या नव्याच आजाराच्या दहशतीचे ढग दाटून आले आहेत. कीटकांपासून माणसात संक्रमित होणाऱ्या या कीटकजन्य आजाराने नागपूरमध्ये पाच बळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही ‘अलर्ट’ घोषित केला आहे.

Scrub typhus entry; District alert | स्क्रब टायफसची एन्ट्री; जिल्ह्यात अलर्ट

स्क्रब टायफसची एन्ट्री; जिल्ह्यात अलर्ट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : डेंग्यू, स्वाइन फ्लूसारख्या संसर्गजन्य आजारांनी आधीच अमरावतीकरांचा जीव मेटाकुटीस आला असताना, ‘स्क्रब टायफस’ या नव्याच आजाराच्या दहशतीचे ढग दाटून आले आहेत. कीटकांपासून माणसात संक्रमित होणाऱ्या या कीटकजन्य आजाराने नागपूरमध्ये पाच बळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही ‘अलर्ट’ घोषित केला आहे. ग्रामीण भागात या रोगाचे पाच रुग्ण आढळले. त्या अनुषंगाने आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. उमेश नावाडे यांनी प्रतिबंधासाठी अधिनस्थ आरोग्य यंत्रणेला लेखी निर्देश दिले आहेत.
हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग विभाग सहसंचालक व आरोग्य सेवा, अकोला उपसंचालकांनी यासंदर्भात आरोग्य यंत्रणेला सजगतेचे निर्देश दिले आहेत. गडचिरोली, नागपूर , अकोला, अमरावती, चंद्रपूर व जिल्ह्यात स्क्रब टायफसचे रुग्ण आढळले. या आजाराने हातपाय पसरण्यापूर्वी सर्वेक्षण, निदान व उपचार करावेत, असे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक, डीएचओ आणि महापालिकांच्या आरोग्य व्यवस्थेला मिळाले आहेत.

आरोग्य सेवा उपसंचालकांचे निर्देश : ग्रामीण भागात पाच रुग्ण
कावीळ श्वसनाचा त्रास
स्क्रब टायफस झालेल्या रुग्णांना कावीळ व श्वसनाचा त्रास होतो. ३५ टक्के रुग्णांना एआरडीएस (अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम) होतो. काही लोकांना किडनीचा त्रास होतो. ३० टक्के लोकांमध्ये शरीरातील अनेक अवयव निकामी होतात. वेळीच योग्य उपचार न झाल्यास ५० टक्के रुग्ण दगावतात. २५ टक्के रुग्णांना मेंदुविकार होतो. रक्त तपासणी आणि श्वसनाच्या लक्षणांवरून रोगनिदान करता येते.
ही आहेत लक्षणे
‘चिगर’ नामक कीटक चावल्यानंतर पाच ते २० दिवसांनी या आजाराची लक्षणे दिसू लागतात. सुरुवातीला ताप, डोकेदुखी, हातपाय दुखणे, ओकाºया आणि इतर ज्वरासारखी लक्षणे असतात. त्यामुळे बºयाच रुग्णांमध्ये मलेरिया, विषमज्वर किंवा डेंग्यू असण्याची शक्यता वर्तविली जाते. ज्या ठिकाणी चिगर चावतो, त्या ठिकाणी एक व्रण असतो. त्याला हशर म्हणतात. परंतु, ४० टक्के रुग्णांमध्ये हा हशर दिसत नाही. या आजारासाठी प्रतिबंधक लस नाही. लवकर निदान, जनजागरण आणि उंदरांवर नियंत्रण राखणे गरजेचे आहे.

असा आहे उपचार
डॉक्सिसायक्लिन अथवा अ‍ॅझिथ्रोमायसिनसारख्या अँटिबायोटिक्सच्या योग्य वापराने या आजारावर उपचार करता येत असल्याचेही आरोग्य सेवा सहसंचालकांनी स्पष्ट केले आहे.

ही चाचणी उपयुक्त
वेलफेलिक्स : रक्तचाचणी करून लक्षणानुसार आजाराचे निदान करता येणे शक्य आहे. टेट्रॅसायक्लिन्स आणि क्लोरोमकिनिकॉल या थेरपीनुसार रिक्टेशिअल आजाराचे निदान होते.

विभागात स्क्रब टायफसचे १० पेैकी दोन रुग्ण कन्फर्म व आठ रुग्ण संशयित आहेत. यंत्रणेला प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे निर्देश दिलेत. अमरावती जिल्ह्यात तीन संशयित रुग्ण आहेत.
- डॉ. अभिनव भुते, सहसंचालक

करजगावच्या एका वृद्ध महिलेची स्क्रब टायफसची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह निघाली. त्यांचा रक्तनमुना मुंबई येथील मेट्रोपॉलिस लॅबला पाठविली आहे. अहवाल येईपर्यंत तो रुग्ण संशयित आहे.
- डॉ. रोहिणी यादगिरे

Web Title: Scrub typhus entry; District alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य