शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

शास्त्रज्ञांनी कुंड गावात शोधले कोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:22 IST

श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय व इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन (कोलकाता) द्वारा पुरस्कृत आंतरराष्ट्रीय परिसंवादासाठी आलेल्या देश-विदेशातील सुमारे ८० शास्त्रज्ञांनी मेळघाटच्या सफारीत कुंड गावात कोळ्यांच्या विविध प्रजातींची ओळख करून घेतली.

ठळक मुद्देमेळघाटात परिसंवाद : ‘स्पायडर’वर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा

आॅनलाईन लोकमतअमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय व इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन (कोलकाता) द्वारा पुरस्कृत आंतरराष्ट्रीय परिसंवादासाठी आलेल्या देश-विदेशातील सुमारे ८० शास्त्रज्ञांनी मेळघाटच्या सफारीत कुंड गावात कोळ्यांच्या विविध प्रजातींची ओळख करून घेतली.बोरी (हरिसाल) येथे मुठवा समुदाय संशोधन केंद्रात आयोजित ‘सायन्स अँड इको सिस्टिम्स इन इंडिया’ या तीनदिवसीय परिसंवादात शास्त्रज्ञांनी आपले शोधप्रबंधही सादर केले. सातपुडा पर्वतरांगेतील जैवविविधता, २१ व्या शतकातील जैवतंत्रज्ञान कौशल्य, वन्यजीव व्यवस्थापनाचे आजच्या काळातील महत्त्व, वन्यजीव व्यवस्थापनात लोकसहभाग आदी विषयांवर अनेक तज्ज्ञ व वन्यजीव अभ्यासकांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.कोळी (स्पायडर) अभ्यासक अतुल बोडखे यांनी विविध प्रजातींचा अभ्यास सादर केला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, उपाध्यक्ष गजानन पुंडकर, कौषाध्यक्ष दिलीप इंगोले, प्राचार्य रामेश्वर भिसे आदींनी परिसंवादाला भेटी दिल्या. विस्थापित कुंड गावात निर्माण झालेल्या जंगलात शास्त्रज्ञांनी वन्यजिवांचा अभ्यास केला. यामध्ये शास्त्रज्ञ वीरेंद्र प्रसाद, सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलिक्यूलर बॉयलॉजी (हैद्राबाद) चे शास्त्रज्ञ सुनीलकुमार वर्मा, शास्त्रज्ञ साजिया काफीन यांच्यासह महेश चिखले, गजानन संतापे, सुभाष कांबळे यांचीही उपस्थिती होती. महाराष्ट्र वाइल्ड लाइफ वॉर्डन ए.के. मिश्रा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारतीय वन्यजीव संशोधन संस्थान (डेहराडून), सातपुडा फाऊंडेशन, राजर्षी शाहू महाविद्यालय (चांदूर रेल्वे), महात्मा फुले महाविद्यालय (वरूड) व मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय (अमरावती) यांनी आयोजनात योगदान दिले.