शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सावटात आजपासून शाळांची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 05:00 IST

कोरोनामुळे मार्चपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळांचे वेतनेतर  अनुदान रखडले आहे. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता कशी जपावी आणि खबरदारीच्या उपाययोजनासाठी निधी कोठून उभा करावा, असा प्रश्न अनुदानित, विनाअनुदानित शाळांसमोर उभा आहे. वर्गखोल्यांचे सॅनिटायझेशन, थर्मल गन, हँड वॉश खरेदीसाठी निधीची वानवा आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषद, नगरपंचायतींच्या शाळांना स्वत: खर्च करावा लागणार आहे.

ठळक मुद्दे३९ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव्ह, शाळा व्यवस्थापन समिती सज्ज, पालक द्विधा मनस्थितीत

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. याच वेळी कोरोनाची दुसरी लाट येणार, असे संकेत आरोग्य प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे शाळा सुरू करण्याविषयी पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालकही द्विधा मनस्थितीत आहेत. मात्र, शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि शिक्षण विभाग कामाला लागला, अशी जिल्ह्यातील स्थिती आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत येणे सक्तीचे नाही, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, वर्गात येताना मुलांना पालकांचे संमतीपत्र अनिवार्य केले आहे. तसेही ऑनलाईन शिक्षणामुळे पालक वर्ग चिंतेत आहे. त्यामुळे मुले घरी राहून मोबाईलमध्ये वेळ घालवितात. त्यापेक्षा शाळेत शिकवणीसाठी गेलेले बरे, असे मत काही पालकांचे आहे. शाळा सुरू करण्यास शिक्षण संस्थांनी विरोध केला असला तरी शासनाच्या आदेशापुढे काहीच नाही, हे वास्तव स्वीकारले आहे. एकूणच गोंधळाच्या स्थितीत सोमवारपासून ५१७ माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू होत आहेत. शाळांचे वेतनेतर अनुदान रखडलेकोरोनामुळे मार्चपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळांचे वेतनेतर  अनुदान रखडले आहे. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता कशी जपावी आणि खबरदारीच्या उपाययोजनासाठी निधी कोठून उभा करावा, असा प्रश्न अनुदानित, विनाअनुदानित शाळांसमोर उभा आहे. वर्गखोल्यांचे सॅनिटायझेशन, थर्मल गन, हँड वॉश खरेदीसाठी निधीची वानवा आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषद, नगरपंचायतींच्या शाळांना स्वत: खर्च करावा लागणार आहे.

गटशिक्षणाधिकाऱ्यांना शाळा भेटी अनिवार्य२३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांना गटशिक्षणाधिकाऱ्यांना भेटी देणे अनिवार्य आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अमोल येडगे यांनी २० नोव्हेंबर रोजी याबाबत पत्र जारी केले. नववी ते बारावीपर्यंतच्या शाळांना गटशिक्षणाधिकाऱ्यांना भेटी देण्याचे यात सूचित केले आहे. शाळा भेटीचा अहवाल विस्तार अधिकाऱ्यांना सादर करावा लागेल.

दिवसाआड वर्ग अन्‌ चार तासिका नववी ते बारावीपर्यंतच्या शाळांमध्ये दिवसाआड वर्ग आणि चार तासिकांचे नियोजन करण्यात आले आहे. इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांची शिकवणी घेण्यात येईल. रविवारपर्यंत सर्व शाळांच्या वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण झाल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.  अनुदानित, विनाअनुदानित शाळांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची व्यवस्था स्थानिक स्तरावर करावी लागणार आहे.  शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकांच्या       बैठकीदेखील आटाेपल्या आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याSchoolशाळा