शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

शेतकरी विधवा निराधार स्वावलंबन योजना बारगळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 16:10 IST

राज्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांना हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजनेतून नि:शुल्क आॅटोरिक्षा परवाने देण्याची योजना आहे

गणेश वासनिकअमरावती : राज्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांना हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजनेतून नि:शुल्क आॅटोरिक्षा परवाने देण्याची योजना आहे. मात्र, या योजनेचा प्रसार व प्रचार झाला नसल्याने मयत शेतकºयांच्या विधवांना उपजिविकेचे साधन म्हणून आॅटोरिक्षा घेता आले नाही. विशेषत: विदर्भात ही योजना बारगळल्याचे वास्तव आहे.टंचाई, गारपीट, अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आणि कर्जफेडीचा तगादा आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याची बाब शासन निदर्शनास आली आहे. त्यामुळे राज्य शासन शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयास सानुग्राह अनुदान म्हणून एक लाख रुपये तातडीची मदत देते. मात्र, मयत शेतकºयांच्या विधवा महिलांना विशेष बाब म्हणून गृहविभागाने २१ जानेवारी २०१६ रोजी आॅटोरिक्षा परवाने देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी ग्राह्य ठरवलेली आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिलांची यादी या योजनेच्या लाभासाठी आवश्यक आहे. परंतु १०,५०० रूपये शुल्क असलेले आॅटोरिक्षा परवाने हे नि:शुल्क मिळत असताना या योजनेचा लाभ विधवांना मिळालेला नाही. एवढेच नव्हे, तर आॅटोरिक्षा घेण्यासाठी शेतकºयांच्या विधवांना बुलडाणा अर्बन को.आॅप क्रेडिट सोसायटीने १०० टक्के कर्जपुरवठा करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, ही निराधार स्वावलंबन योजना आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या दारी पोहचलेली नाही. शासनाने या योजनेला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले असताना विदर्भातील शिवसैनिकांनी शेतकरी विधवांना योजनेचा लाभ मिळवून देण्याचा फारसा प्रयत्न केला नाही, हे विशेष. त्यामुळे सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या विदर्भात ही योजना बारगळल्याचे वास्तव आहे.

असे मिळेल ऑटोरिक्षा१९ डिसेंबर २००५ आणि २२ जानेवारी २००६ च्या शासन निर्णयानुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांना १ लाख रूपयांचे अनुदान मिळालेल्या महिलांना प्राधान्य असेल. आॅटोरिक्षा परवाने देताना अटी, शर्ती शिथिल धोरण राबविले जाईल. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या इंधनावर चालणारे आॅटोरिक्षा मिळेल. आॅटोरिक्षासाठी बँकेतून कर्जाबाबत जामीनदार नियुक्त केले जातील.

दोन वर्षांत सहा जिल्ह्यांत २,१४३ शेतकरी आत्महत्याअमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा हे सहा जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून शासनाने घोषित केले. सन २०१६ व २०१७ या दोन वर्षांत २१४३ शेतकºयांनी आत्महत्या केल्याची नोंद प्रशासन दत्फरी आहे. यात अमरावती जिल्ह्यात ६१०, अकोला ३२०, यवतमाळ ५०९, बुलडाणा ५४६, वाशिम १५८ तर वर्धा २३५ असे शेतकरी आत्महत्या झालेल्यांचा समावेश आहे.

योजनेचे उद्दिष्ट चांगले आहे. परंतु, ही योजना ज्या कुटुंबीयांसाठी लागू केली, त्यांच्यापर्यंत पोहचलेली नाही. त्यामुळे शेतकरी विधवांना पाहिजे त्या प्रमाणात आॅटोरिक्षा परवाने मिळाले नाही.- विजय काठोडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती