्रपायाभूत विकास चाचण्यांचे वेळापत्रक कोलमडले
By Admin | Updated: August 28, 2015 00:47 IST2015-08-28T00:47:38+5:302015-08-28T00:47:38+5:30
इयत्ता दुसरी ते आठवितील विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानावर आधारित पायाभूत विकास चाचण्यांचे वेळापत्रक परीक्षा सुरू होण्याआधीच कोलमडले.

्रपायाभूत विकास चाचण्यांचे वेळापत्रक कोलमडले
अमरावती : इयत्ता दुसरी ते आठवितील विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानावर आधारित पायाभूत विकास चाचण्यांचे वेळापत्रक परीक्षा सुरू होण्याआधीच कोलमडले. २४ ते ३१ आॅगस्टदरम्यान या परीक्षा होणार होत्या. मात्र शासकीय मुद्रणालयात प्रश्नपत्रिकांची छपाईच झाली नसल्याने या परीक्षा आता सप्टेंबर महिन्यात होणार आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत दुसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या चाचण्या होत आहेत. विद्यार्थ्याने वयोगटानुसार क्षमता केली आहे किंवा नाही याची तपासणी विविध शैक्षणिक प्रगती चाचण्यांमधून होणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सूचनानुसार २४ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत या चाचण्या घेण्यात येणार होत्या. मात्र चाचण्यासाठी लागणाऱ्या प्रश्नपत्रिका केंद्रीय स्तरावर छापली जाणार आहेत. त्यासाठी लागणारा कागद खरेदी करणे व इतर प्रक्रिया राबविण्यासाठी कागद खरेदी करण्याची प्रक्रिया राबविण्यासाठी ई-निविदांचे सोपसकार पार पाडणे व प्रश्नपत्रिका छपाईसाठी लागणारा कालावधी लक्षात घेता पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार परीक्षा घेणे शक्य नसल्याचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने या परीक्षा आता पुढे ढकलल्या आहेत. मुलांची लेखन, वाचन आणि आकलनात किती प्रगती झाली? त्याच्या क्षमतेत किती वाढ झाली, याचे मूल्यमापन करण्यासाठी अशा चाचण्या घेतल्या जाणार आहेत. अशा प्रकारची या वर्षातील ही पहिली परीक्षा राहणार आहे. यानंतर १६ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान दुसरी चाचणी व १ ते १६ एप्रिल २०१६ दरम्यान तिसरी चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात प्रश्नपत्रिकांची छपाई करावी लागणार आहे. त्यासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेला वेळ लागणार असल्यामुळे आॅगस्ट अखेरपर्यंत वेळ लागणार आहे. त्यामुळे चाचणी घेणे शक्य नसल्याने वेळापत्रक कोलमडल्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढवली आहे. (प्रतिनिधी)