सर्वेष शाहू ‘महापौर श्री’

By Admin | Updated: December 23, 2015 00:04 IST2015-12-23T00:04:07+5:302015-12-23T00:04:07+5:30

महापालिका व आझाद हिंद मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. हरिभाऊ कलोती स्मुतप्रित्यर्थ सोमवारी पार पडलेल्या ...

Sarasw Shahu 'Mayor Shree' | सर्वेष शाहू ‘महापौर श्री’

सर्वेष शाहू ‘महापौर श्री’

राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा : अकोल्याचा सुयश जडिया ‘बेस्ट पोझर’
अमरावती : महापालिका व आझाद हिंद मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. हरिभाऊ कलोती स्मुतप्रित्यर्थ सोमवारी पार पडलेल्या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत येथील सर्वेष साहू याने महापौर श्री किताब तर अकोला येथील सुयश जडिया याने बेस्ट पोझरचा बहुमान पटकावित क्रीडा प्रेमींची दाद मिळविली.
ही स्पर्धा सहा गटात घेण्यात आली. यात ६० ते ६५, ६५ ते ७०, ७० ते ७५, ७५ ते ८०, ८० ते ८५ किलो वजन गटात एकूण ९७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेतील प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पाचव्या क्रमांकावर येणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे ७००१ रुपये, ५००१, ३००१, २००१ व १००१ रुपये देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पंच नेमण्यात आले होते. त्यानुसार सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वेष साहू याला महापौर श्री किताबाने गौरविताना रोख ३०००१ व आर्कषक ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

सौष्ठवपटूंना प्रोत्साहनपर बक्षिसे
अमरावती : स्पर्धेतील बेस्ट पोझर ठरलेल्या अकोला येथील सुयश जडीया याला आझाद श्री हा किताब व रोख १०००१ रुपये बक्षीस बहाल करण्यात आले. प्रोत्साहनपर बक्षीस अब्दुल रहीम, विजय कोल्हे, पद्मानंद वानखडे, वैभव काळे, सुदर्शन शिर्के, मोहम्मद कुरेशी, गोंविद जवादे, विजय भोयर, विजय जाधव, आकाश डुप्पलवार, अकरम खान यांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी पक्षेनता बबलू शेखावत, स्थायी समिती सभापती विलास इंगोले,गटनेता अविनाश मार्डीकर, संजय अग्रवाल, दिंगबर डहाके, सुगनचंद गुप्ता, राजेंद्र महल्ले, दिनेश बूब, हमीद शद्दा, साबीर पहेलवान, शोएब खान, नदीम खान, क्रीडा अधिकारी प्रवीण ठाकरे, दिलीप दाभाडे, पंच दीपक बागुल, राजाभाऊ मोरे, प्रशांत देशपांडे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत ६० ते ६५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक नीलेश राऊत (अमरावती), द्वितीय क्रमांक मोहित वानखडे ( बुलडाणा), तृतीय क्रमांक रोहित साहू (अमरावती).
६५ ते ७० किलो वजन गटात प्रथम क्रमांक राजा ढोमणे (नागपूर), द्वितीय क्रमांक सलाम खान, तृतीय क्रमांक समीर खान (अमरावती).
७० ते ७५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक नावेद इकबाल (अमरावती), द्वितीय क्रमांक मुकेश साहू (नागपूर), तृतीय क्रमांक सुयश जडीया (अकोला).
७५ ते ८० किलो वजन गटात प्रथम क्रमांक रहीम खान (अमरावती), द्वितीय क्रमांक अक्षय पराते (नागपूर), तृतीय क्रमांक कमलेश कश्यप (चांदुर बाजार)
८० ते ८५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक राज साहू (अमरावती), द्वितीय क्रमांक वैभव मरक्केवार (अकोला), तृतीय क्रमांक शशांक साहू (नागपूर) ८५ किलोवरील गटात प्रथम क्रमांक सर्वेश साहू (अमरावती), द्वितीय क्रमांक अमोल उंबरकर (अमरावती), तृतीय क्रमांक संतोष वाघ (वर्धा) चा समावेश आहे

Web Title: Sarasw Shahu 'Mayor Shree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.