सरमसपुरा पोलिसांनी अवैध गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:10 IST2021-05-31T04:10:53+5:302021-05-31T04:10:53+5:30

अवैध मांसविक्री विरुद्ध कारवाई परतवाडा : अचलपूर शहरातील सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा विक्री करणाऱ्याविरुद्ध मोहीम ...

Saramaspura police seized illegal gutka | सरमसपुरा पोलिसांनी अवैध गुटखा पकडला

सरमसपुरा पोलिसांनी अवैध गुटखा पकडला

अवैध मांसविक्री विरुद्ध कारवाई

परतवाडा : अचलपूर शहरातील सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा विक्री करणाऱ्याविरुद्ध मोहीम राबविण्यात आली. रविवारी दुचाकीची तपासणी केली असतात अवैध गुटका आढळून आला.

अयाजोद्दीन काझी गुलाम मोहियोदीन (४३, रा. अशरफपुरा अचलपूर) असे आरोपीचे नाव असून त्याच्याजवळून प्रतिबंधित नागपुरी प्रिमियम कंपनीचा गुटखा ५० पाकिटे किंमत ६५०० रुपये व १५ हजार रुपयांची दुचाकी असा एकूण २१,५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार

जमील शेख जमादर, विलास पवार, दयाराम अधिकार, पंकज ठाकरे, सचिन कोकणे आदींच्या पथकाने केली.

बॉक्स

गोमांस विक्री करताना पकडले

दुसऱ्या एका घटनेत सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोमांस विक्री करताना पकडले. आरोपी सै सादिक सै मुश्ताक (२४) व सै मुश्ताक सै मुनाफ कुरेशी (५३, दोन्ही रा फरमानपुरा अचलपूर) यांना अंदाजे ५० किलो गोमांस किंमत अंदाजे ५००० रुपये व दुचाकी ५०००० रुपये अशा एकूण ५५००० च्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

===Photopath===

300521\img-20210530-wa0050.jpg

===Caption===

सरमसपुरा पोलीस स्टेशन अवैध गुटखा

Web Title: Saramaspura police seized illegal gutka