मनसेद्वारा महापालिकेत सॅनिटायझर फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:06 AM2021-05-04T04:06:37+5:302021-05-04T04:06:37+5:30

चष्म्याची दुकाने, सीए कार्यालयांना मुभा अमरावती : चष्म्याची, तसेच श्रवणयंत्रांची दुकाने व सनदी लेखापालांची कार्यालये संचारबंदीच्या कालावधीत सकाळी ७ ...

Sanitizer spraying in Municipal Corporation by MNS | मनसेद्वारा महापालिकेत सॅनिटायझर फवारणी

मनसेद्वारा महापालिकेत सॅनिटायझर फवारणी

Next

चष्म्याची दुकाने, सीए कार्यालयांना मुभा

अमरावती : चष्म्याची, तसेच श्रवणयंत्रांची दुकाने व सनदी लेखापालांची कार्यालये संचारबंदीच्या कालावधीत सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहू शकतील. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी जारी केला. आदेशानुसार, कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात १५ मेपर्यंत संचारबंदी आदेश लागू आहेत. जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

------------------

उद्या कोरडे, दोन दिवसांनी पाऊस

अमरावती बदलत्या वातावरणात ४ व ५ मे रोजी वातावरण कोरडे राहणार आहे व त्यानंतर ६ तारखेला तुरळक ठिकाणी वादळासह पावसाची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले. मंगळवारी तापमान २ ते ३ अंशांनी वाढणार असल्याचे ते म्हणाले.

-------------------

सायंकाळी वादळासह तुरळक सरी

अमरावती : शहरात सोमवारी सायंकाळी जोराच्या वाऱ्यासह पावसाच्या तुरळक सरी कोसळल्याने शहराच्या काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तारांबळ उडाली. जिल्ह्यातील काही भागात पाऊस झालेला असला तरी नुकसान कुठेही झालेले नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Sanitizer spraying in Municipal Corporation by MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.